Month: August 2025
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार ?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येतात. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांच्या नजरा लागल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500
Independence Day 2025: यंदाचा स्वातंत्र्यदिन 78 वा आहे की 79 वा ?
मुंबई : 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा केला जाईल. मात्र यंदाचा स्वातंत्र्यदिन हा 78 वा आहे का 79 वा असा प्रश्न अनेकांना पडलाय. खरंतर दरवर्षीच हा प्रश्न भारताच्या नागरिकांना पडत असतो. याचं नेमकं उत्तर अनेकांना जंगजंग पछाडल्यानंतरही सापडत नाही. अत्यंत सोप्या भाषेत आम्ही ही शंका दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला खात्री आहे
नागपुरातील हृदयद्रावक घटना, मदत न मिळाल्याने पत्नीचा मृतदेह बाईकला बांधून नेण्याची वेळ
Nagpur News: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर काळीज पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळालं. एका ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर, मदत मागूनही कोणीही न थांबल्याने एका हतबल पतीने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात रविवारी दुपारची ही घटना आहे. मृत महिलेचे
Nashik CBI Raid : नाशिक, इगतपुरीतील प्रसिद्ध रिसॉर्टमधील बेकायदेशीर कृत्याचा भांडफोड
CBI च्या धाडीमध्ये घटनास्थळावरुन 44 लॅपटॉप, 71 मोबाइल फोन, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. Nashik Crime News : इगतपुरीतील प्रसिद्ध रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये CBI ने बेकायदेशीर (CBI raids Rain Forest Resort in Igatpuri) कॉल सेंटर उद्ध्वस्त केल्याचं उघडकीस आलं आहे. CBI कडून रिसॉर्टमालकासह, रिसोर्टच्या
सर्वसामान्यांच्या मंत्रालयातील प्रवेशाचा वेळा बदलल्या, आता ‘या’ वेळात मंत्रालयात मिळणार प्रवेश
मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड इ. शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. मुंबई : Mantralaya News: राज्यातील अनेक लोक आपली कामं घेवून मंत्रालयात येत असतात. त्यांना दुपारनंतर मंत्रालयात प्रवेश दिला जातो. दुपारी दोननंतर सर्वसामान्यांसाठी मंत्रालयाचे दरवाजे खुले केले जातात. मात्र या वेळीत आता बदल करण्यात आला आहे. नागरिकांची होणारी गैर सोय.
Police Bharati News: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय राज्यात 14 हजार पदांसाठी पोलीस भरती
पोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईसाठी ही एक मोठी संधी निर्माण होणार आहे. Maharashtra Police Bharti News : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. राज्य सरकारने पोलीस भरती संदर्भात आजच्या
२: शिष्यवृत्ती – महत्त्वाच्या संधी, गरज फक्त माहितीची ! 2: Scholarships – Important opportunities, all you need is information!
देशात आणि राज्यात शिष्यवृत्तींचा खजिना उपलब्ध आहे, पण अनेकांना याची माहितीच नसते. योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास आर्थिक अडचणींची तमा न बाळगता शिक्षण पूर्ण करता येते. १. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती: NSP (National Scholarship Portal) वर अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत जसे की PM Scholarship, Post Matric Scholarship, Merit cum Means आदि. अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक
१: स्पर्धा परीक्षा – MPSC किंवा UPSC सुरुवात कशी करावी ? 1: Competitive Exam – How to start MPSC or UPSC ?
स्पर्धा परीक्षा हे आजच्या तरुणांसाठी भविष्य निर्माण करण्याचे एक प्रभावी साधन बनले आहे. MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) आणि UPSC (संघ लोकसेवा आयोग) या परीक्षा देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदांवर पोहोचण्याची संधी देतात. पण या परीक्षांची तयारी करताना सुरुवात योग्य पद्धतीने झाली पाहिजे. १. स्वप्न स्पष्ट करा: UPSC किंवा MPSC देण्यामागे तुमचा उद्देश काय आहे, हे स्पष्ट
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या नूतन इमारतींचे उद्घाटन
📍मुंबई चेंबूर : चेंबूर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या नूतन इमारतींचे उद्घाटन मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाले. सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी वसतिगृहे
राज्य सरकारने केंद्र सरकारला हमी देऊन महात्मा फुले महामंडळाला निधी द्यावा – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन
मुंबई : ०६/०८/२०२५ रोजी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनच्या वतीने काल मंत्रालय येथे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली. समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडे NSFDC योजने अंतर्गत अनेक प्रस्ताव गेल्या तीन वर्षापासून रखडून आहे. केंद्र सरकारला राज्य सरकाने निधी परतव्याची हमी दिली नसल्या कारणाने केंद्र सरकारचा हा निधी अखर्चित









