राज्य सरकारने केंद्र सरकारला हमी देऊन महात्मा फुले महामंडळाला निधी द्यावा – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन

मुंबई : ०६/०८/२०२५ रोजी  स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनच्या वतीने काल मंत्रालय येथे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली. समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडे NSFDC योजने अंतर्गत अनेक प्रस्ताव गेल्या तीन वर्षापासून रखडून आहे. केंद्र सरकारला राज्य सरकाने निधी परतव्याची हमी दिली नसल्या कारणाने केंद्र सरकारचा हा निधी अखर्चित म्हणून पडुन आहे.
तरी समाजकल्याण विभागाचे जिम्मेदार महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आयु. संजय शिरसाठ म्हणून आपण यात लक्ष घालावे अशी चर्चा केली.
अजित पवार यांच्या सोबत बैठक लावून राज्य सरकारकडून हमी देण्या बाबत बैठक ठरल्या नंतर तुमच्या शिष्टमंडळाला बोलावून यावर उपाय काढू असा शब्द या वेळी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आयु. संजय शिरसाठ यांनी दिला
या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (आय.टी. सेल) स्वप्निल केदारे तसेच चेतन गांगुर्डे, बाळासाहेब शेजवळ, राहूल सोनवणे, अमोल चंद्रमोरे, संकेत बर्वे, विकी दुर्धवळे, रोहित गांगुर्डे आदी उपस्थित होते.