15 ऑगस्ट 2025 नंतर SBI ग्राहकांच्या ऑनलाइन मोठ्या रकमेच्या IMPS व्यवहारांवर खात्यातून होणार अशी कपात

SBI  – स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank Of india ) ने आपल्या ग्राहकांसाठी तात्काळ पैसे हस्तांतरण सेवेत (IMPS) बदल जाहीर केला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन मोठ्या रकमेच्या IMPS व्यवहारांवर नाममात्र शुल्क आकारले जाईल.

IMPS म्हणजे काय : IMPS ही राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे चालवली जाणारी तात्काळ पैसे हस्तांतरण सेवा आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध असून, रविवार आणि सुट्ट्यांवरही पैसे त्वरित पाठवता येतात. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, एटीएम किंवा बँक शाखेद्वारे ही सेवा वापरता येते. खाते क्रमांक आणि IFSC कोड किंवा मोबाइल नंबर आणि MMID वापरून पैसे पाठवले जाऊ शकतात. NEFT च्या तुलनेत IMPS मध्ये पैसे तात्काळ जमा होतात आणि एकदा व्यवहार झाला की तो थांबवता येत नाही.

सध्या सर्व ऑनलाइन IMPS व्यवहार मोफत आहेत, परंतु आता फक्त २५,००० रुपयांपर्यंतचे व्यवहारच मोफत राहतील.

SBI ने आता ऑनलाइन IMPS व्यवहारांसाठी नवे शुल्क निश्चित केले आहे:

२५,००० रुपयांपर्यंत: मोफत
२५,००१ ते १ लाख: २ रुपये + जीएसटी
१ लाख ते २ लाख: ६ रुपये + जीएसटी
२ लाख ते ५ लाख: १० रुपये + जीएसटी

केंद्र व राज्य सरकार कर्मचारी, रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील सॅलरी पॅकेज खातेदारांना या शुल्कातून सूट मिळेल. बँक शाखेद्वारे होणाऱ्या IMPS व्यवहारांवर कोणताही बदल झालेला नाही. येथे २ रुपये + जीएसटीपासून २० रुपये + जीएसटीपर्यंतचे शुल्क लागू राहील.

अगोदर पासून इतर बँकांमध्ये IMPS वर आधीपासूनच शुल्क आकारले जाते:

कॅनरा बँक: १,००० रुपयांपर्यंत मोफत, ५ लाखांपर्यंत २० रुपये + जीएसटी.
पंजाब नॅशनल बँक: १,००१ ते १ लाखापर्यंत ५ रुपये + जीएसटी, त्यापुढे १० रुपये + जीएसटी.
ICICI बँक: १,००० पर्यंत २.५ रुपये + जीएसटी, १ लाखापर्यंत ५ रुपये + जीएसटी.
कोटक महिंद्रा बँक: नेट/मोबाइल बँकिंगद्वारे IMPS मोफत.
इंडियन बँक: १,००० पर्यंत मोफत, मोठ्या रकमेवर १५ रुपये + जीएसटी.

ग्राहक NEFT, RTGS किंवा UPI सारख्या पर्यायांचा विचार करू शकतात.
IMPS हे भारतातील सर्वात जलद आणि सोयीस्कर पैसे हस्तांतरणाचे साधन आहे. SBI च्या नव्या शुल्कामुळे छोट्या व्यवहारांवर परिणाम होणार नाही, परंतु मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी खर्च वाढू शकतो. त्यामुळे ग्राहक NEFT, RTGS किंवा UPI सारख्या पर्यायांचा विचार करू शकतात.