Skip to content

Menu

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress

नंबर १ मराठी न्यूज
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा
You are here :
  • Home
  • महाराष्ट्र
  •  कोल्हापूर सर्किट बेंचबाबत जे अशक्य ते शक्य करून दाखवलं ; सरन्यायाधीशांचं संपूर्ण भाषण
Written by August 18, 2025

 कोल्हापूर सर्किट बेंचबाबत जे अशक्य ते शक्य करून दाखवलं ; सरन्यायाधीशांचं संपूर्ण भाषण

महाराष्ट्र Article

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचच्या इमारतीचा लोकार्पण केलेले जोरदार भाषण मागील 42 वर्षापासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच खंडपीठ व्हावं अशी मागणी होती. ही मागणी आज सर्किट बेंचच्या रूपाने पूर्ण झाली आहे. हे सर्किट बेंच कोल्हापूर सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी असणार आहे. या सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात पार पडला. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचच्या इमारतीचा लोकार्पण केलं.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, इतरही काही मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणात ही  काय झाडी काय डोंगर, सगळं एकदम ओके याचा उल्लेख आला. कोल्हापूर भेटी मागचा यामध्ये संदर्भ होता. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं ही ते यावेळी म्हणाले. कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रूपाने खंडपीठाच्या लढाईला यश आल्याचे पाहायला मिळालं. या सर्किट बेंचच भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच आहे. 18 ऑगस्ट पासून या सर्किट बेंचचं कामकाज सुरू होत आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमातून बोलत असताना लोकांच्यासाठी सुरू झालेले हे न्यायालय असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे हे कोणी एका वकिलासाठी नाही तर दुर्गम भागातल्या न्यायापासून वंचित असलेल्या व्यक्तीसाठी आहे असं अधोरेखित केलं.

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाजवळील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत हे सर्किट बेंच असणार आहे. सरन्यायाधीशांच्या हस्ते या इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. हा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर मेरी वेदर ग्राउंडवर झालेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भाषण केलं. कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातून आलेला प्रत्येक व्यक्ती सरन्यायाधीशांचे भाषण ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता. त्यांचं भाषण संपले पर्यंत हा प्रत्येक व्यक्ती जागेवरून उठलेला नव्हता. सरन्यायाधीशांनी केलेल्या भाषणामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे होते. या भाषणांमध्ये कोल्हापूरला सर्किट बेंच कसं मंजूर झालं, शाहूनगरीतलं हे सर्किट बेंच सगळ्यात महत्त्वाचं, सर्किट बेंच खंडपीठात रूपांतरालाही यश येईल, दुर्गम भागातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सर्किट बेंच न्याय देण्याचे काम करेल हे मुद्दे महत्त्वाचे ठरले.

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई भाषण करताना म्हणाले की, शाहूनगरीत सुरू होत असलेल्या या सर्किट बेंचच्या रूपाने सुरु झालेल्या खऱ्या अर्थाने न्याय मिळेल विचार माझ्या मनात आहे. 40-45 वर्षांपूर्वी येथील वकिलांनी जे स्वप्न पाहिलं त्यामध्ये मी सहभागी झालो. या स्वप्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले. खंडपीठाच्या भूमिकेला मी जाहीर पाठिंबा दिला. एका भाषणात मी जाहीरपणे हे सांगितलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या धरतीमध्ये सुरु झालेल्या सर्किट बेंचच लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. पण कोल्हापूर सर्किट बेंचला हवं खंडपीठ आहे असंचं मी म्हणेन. मला कोल्हापूरला निमंत्रण देण्यात आलेलं. मी कोल्हापूरला एक विशेष कार्यक्रमासाठी येणार हे ठरवलेलं. आज मी शाहूंच्या नगरीत आलो आणि ते पण सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी याचा मला आनंद आहे.

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळात केलेले अनेक कार्य महत्त्वपूर्ण आहेत. त्यांनी केलेलं कार्य हे समाजातील सर्व घटकांसाठी आहे. त्यांनी दिलेले रंजल्या गांजल्याच्या सेवेचे विचार मी घेतले. शाहू महाराजांनी एका दलिताला हॉटेल चालू करून दिलं. विधवांना अधिकार दिले, देवदासी प्रथा बंद केली अशी अनेक गौरवास्पद कार्य त्यांची आहेत. इतकच नाहीतर सरन्यायाधीशांनी एका कवितेतून शाहू महाराजांचे विचारही सांगितले.  शाहू महाराजांचा वारसा सांगणं म्हणजे  समानता जपणं, शिक्षणाची संधी, योग्य असे कायदे करणं, जे बोलतो ते करणं हेच खऱ्या अर्थाने आहे. महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीची माहिती देत त्यांनी अभिवादन केलं. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याबाबत त्यांनी सांगितलं. त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचाही भाषणात उल्लेख केला.  आंबेडकरांना चळवळ सुरू करण्यासाठी शाहू महाराजांनी मदतही केल्याचं सांगितलं. त्यामुळे हे सगळे विचार माझ्यात रुजले आहेत असं म्हणत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा निर्धारही केला.

मी छत्रपती शाहू महाराजांचा आदर करतो त्यांच्या वंशजानी माझं स्वागत केलं. कोल्हापूरकरांनी मी आल्यानंतर जे प्रेम दाखवलं त्याबाबत देखील आभारी आहे. कोल्हापूरच खंडपीठ हा या देशातील न्याय मिळण्याबाबतचा मोठा मैलाचा दगड ठरणार आहे. समान्य नागरिकांना न्यायापासून वंचित ठेवणं हे आपल्या न्यायावस्थेशी विसंगत आहे. म्हणूनच कोल्हापुरातले सर्किट बेंच दुर्गम भागातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी न्याय देणारे ठरणार असेल. कर्नाटक सीमेवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड हे गाव असू दे किंवा अगदी सिंधुदुर्ग सावंतवाडी मधील एकादस दुर्गम गाव असू दे या प्रत्येक गावातल्या नागरिकाच्या हक्कासाठी हे न्यायालय असेल.  एखाद पद हे अधिकार गाजवण्यासाठी नाही तर समाजासाठी सेवा करण्याची दिलेली संधी आहे. हे सर्किट बेंच कोणत्या एखाद्या वकिलासाठी नाही तर ते एका सामान्य नागरिकासाठी आहे. आणि या नागरिकाला न्याय मिळणे सुद्धा तितकच महत्त्वाचा आहे.

कोल्हापूर सर्किट बेंचच्या मंजुरीवर बोलताना ते म्हणाले की, हे सर्किट बेंच मंजूर होईपर्यंत जास्त काही बोललं तर अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळं बोलण टाळलं. 28 जून रोजी नागपूरला मी, आराध्ये आणि मुख्यमंत्री एकत्र होतो. त्यावेळी या खंडपीठबाबत चर्चा झाली. याच कार्यक्रमात 15 ऑगस्टनंतर तारीख घेण्याचं ठरवलेले. महाराष्ट्र हे जुडीशरी इन्फ्रास्टक्चर मध्ये मागे आहे असं काहीजण म्हणायचे पण आम्ही काम केलं. कमी वेळात कसं सगळं करणार हा प्रश्न उपस्थित होतं होते. पण जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवलं. 20 दिवसात इमारत डागडुजी करून सज्ज केली. कमी वेळात इमारतीची केलेली सजावट यासाठी प्रशासनाचे देखील कौतुक केले.

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब बोलत असताना कोल्हापुरातील वकील विवेक घाटगे यांच्या भाषणाविषयी आवर्जून उल्लेख केला. त्यांच्याबाबत माहिती देत असताना त्यांनी मिश्किल टिप्पणी देखील केल्या. ही टिप्पणी खरंतर नेमके कोणासाठी होती असा प्रश्न आहे. गुवाहाटीचे प्रकरण ज्या काळात चर्चेत होतं त्या काळात मी विवेक घाटगे यांची काही भाषणे देखील पाहिली असं सरन्यायाधीश म्हणाले.  त्यांचं हे भाषण पाहिलं त्याच काळात मी आणखी एक चर्चेतलं भाषण ऐकलेलं होतं. ते भाषण म्हणजे काय ते डोंगर काय ती झाडी काय ते हॉटेल. सर न्यायाधीशांनी उल्लेख केलेल्या या शब्दांमुळे श्रोत्यांमध्ये हास्य उमटले. कोल्हापूर आणि इतर काही जिल्ह्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ व्हावं अशी मागणी होती. 1983 ला पाहिल्या वेळी कोल्हापूर खंडपीठ मागणीच्या आंदोलनाला सुरुवात झाली. पुढे काही काळ हे आंदोलन मंद गतीने सुरु होते. मात्र 2010 पासून या आंदोलनाने गती पकडली. 2010 ला एक आंदोलनाची पडलेली ठिणगी 2025 पर्यंत सुरु होती. सातत्याने आंदोलने करणं सुरु झालेलं होतं. 2012 मध्ये कोल्हापूर बंद ठेवत ही लढाई आणखी तीव्र झाली. दरम्यानच्या काळात 55 दिवस साखळी उपोषण सुरु केलेलं होतं.

या काळात न्यायालयीन कामकाज बंद होतं. या आंदोलनाच्या तीव्रतेनंतर 2013 ला कराड येथे वकिलांची पहिली परिषद पार पडली. 2024 पर्यंत एकूण चार परिषद यासाठी झाल्या. 2025 मध्ये पदवीधर मित्र संघटनेचे माणिकराव साळुंखे यांनी 9 दिवस उपोषण केलेलं. फेब्रुवारीमध्ये वकिलांची पंढरपूर ते कोल्हापूर पदयात्रा देखील झाली. या सगळ्या लढ्यानंतर अखेर 1 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्याकडून कोल्हापूरला सर्किट बेंचची अधिसूचना जाहीर केली. इतकंच नाही तर तातडीने 18 ऑगस्ट रोजी हे सर्किट बेंच सुरु होणार अशी घोषणा देखील झाली.

मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर सर्किट बेंच हे कोल्हापुरातील जुनं न्यायालय ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी सुरु होत आहे. ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी या इमारतीला आहे. श्री राधाबाई बिल्डिंग या इमारतीला एक ऐतिहासिक असा संदर्भ देखील आहे. जवळपास पावणे दोनशे वर्ष याच परिसरात न्यायदानाच काम चालायचं असा इतिहास आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीरनगरीत हे सर्किट बेंच सुरु होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे सर्किट बेंच सुरु झाल्यामुळे सहा जिल्ह्याना याचा फायदा होणार आहे.

 

You may also like

Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला

November 26, 2025

Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.

November 26, 2025

Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, 50 लाखांची आर्थिक फसवणूक भोंदू बाबा अद्यापही फरार

November 23, 2025
Tags: Kolhapur

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress