
Property News : जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी समोरच्यावर ( विरुद्ध पक्षकार ) कायदेशीर कारवाई कशी कराल ?
Property News : ग्रामीण, शहरांमध्ये शेतजमिनी घराच्या भूखंडावर शेजाऱ्यांकडून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येतात.
मुंबई : ग्रामीण भागात तसेच शहरांमध्ये शेतजमिनीवर किंवा घराच्या भूखंडावर शेजाऱ्यांकडून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येतात. लहानशा रस्त्याचा भाग, पिकांची जमीन किंवा घराभोवतालचा मोकळा पट्टा शेजाऱ्यांनी स्वतःच्या वापरासाठी घेतल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क जमिनीच्या मालकाला आहे. मात्र योग्य प्रक्रिया आणि पुरावे नसल्यास अशा प्रकरणात पीडित व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणूनच कायदेशीर मार्ग जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
प्रथम मोजणी आणि नकाशा तपासणी : सर्वप्रथम शेजाऱ्याने खरोखर अतिक्रमण केले आहे का हे खात्रीने जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा भूमापन कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून जमिनीची मोजणी करून घ्यावी. सातबारा उतारा, फेरफार नोंदी, जमीन नकाशा आणि मालकीचे कागदपत्रे यांची तपासणी केली जाते. मोजणीच्या अहवालात अतिक्रमण स्पष्ट झाल्यास पुढील कारवाईसाठी तेच महत्त्वाचे पुरावे ठरतात.
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||


