Skip to content

Menu

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress

नंबर १ मराठी न्यूज
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा
You are here :
  • Home
  • महाराष्ट्र
  • Ajit Pawar: अजित पवारांची मोठी घोषणा कृषी क्षेत्रात AI वापरासाठी 500 कोटी रुपये
Written by August 27, 2025

Ajit Pawar: अजित पवारांची मोठी घोषणा कृषी क्षेत्रात AI वापरासाठी 500 कोटी रुपये

महाराष्ट्र Article

पुणे: राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका आर्थिक वर्षासाठीच हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर मार्फत श्री छत्रपती मंगल कार्यालय येथे आयोजित शेतकरी मेळावा, त्याअंतर्गत ‘ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावरील मार्गदर्शन आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, व्हाईस चेअरमन कैलास गावडे आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या व शेतकरी मेळाव्याच्या आयोजनाबद्दल कारखान्याने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून पवार म्हणाले, जमिनीची घटती सुपीकता, खतांचा वाढता खर्च, पाण्याची कमतरता, उसाची घटती उत्पादकता, वातावरणीय बदल, घटता उतारा यामुळे शेतकरी आणि कारखाने अडचणीत आले आहेत. या एआय तंत्रज्ञानाच्या वापराने उसाच्या उत्पादनात 40 टक्क्यांवर वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतीला किफायतशीर करण्यासाठी एआय तंत्रज्ञान ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. उसासोबतच फळबागा, कापूस, सोयाबीन पिकासाठीही एआयच्या वापराची तयारी करण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले.

वाढती लोकसंख्या, वाढते नागरिकरण, विकास कामांसाठी जमिनीचा वापर त्यामुळे शेतीसाठीची जमीन कमी होत असून, आहे त्या जमिनीत जास्तीचे उत्पादन काढल्याशिवाय देशाला आवश्यक कृषी उत्पादन मिळू शकणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, असेही ते म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हेक्टरी 25 हजार रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी 9 हजार रुपये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर कारखाना पावणेसात हजार रुपये अग्रिम म्हणून देणार असून शेतकऱ्यांनी नऊ हजार रुपये भरायचे आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यातील शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान यापुढे वेळेवर मिळेल यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. एआयच्या वापरासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे. हवामानात बदल होत असताना त्यावर मात करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे, असे सांगून, उसाचे बियाणे दर तीन वर्षांनी बदलावे, जमिनीची सुपीकता घटू नये यासाठी तणनाशकांचा वापर टाळावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरातील रस्त्यांच्या विकासकामांकरिता 10 कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच कारखान्याने रयत शिक्षण संस्थेला शाळा उभारण्यासाठी 81 आर जमीन द्यावी. शाळा इमारत उभारणीसाठी 4 कोटी रुपयांची तरतूद ज्येष्ठ खासदार शरद पवार आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले. कारखान्याला राज्य शासन, जिल्हा बँकेच्या स्तरावर मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून आगामी काळातही कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासनही त्यांनी दिले.

You may also like

Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला

November 26, 2025

Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.

November 26, 2025

Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, 50 लाखांची आर्थिक फसवणूक भोंदू बाबा अद्यापही फरार

November 23, 2025

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress