मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गावांना सक्षम करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्यात आला. महाराष्ट्रात ‘महानेट’ प्रकल्पही यशस्वीपणे राबवला जात आहे. Nagpru News : केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत ‘व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेस’ या संस्थेने देशातील 24 कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत आणि राज्य सरकार व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे हे गाव देशातील पहिले ‘स्मार्ट व इंटेलिजंट’ गाव ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.‘भारतनेट’ आणि ‘महानेट’ प्रकल्पाची अंमलबजावणी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गावांना सक्षम करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्यात आला. महाराष्ट्रात ‘महानेट’ प्रकल्पही यशस्वीपणे राबवला जात आहे. याच प्रवासात आता भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
सातनवरी गावात उपलब्ध असलेल्या 18 सेवा सातनवरी गावात आरोग्य, शिक्षणासोबतच ‘स्मार्ट सिंचन’, ड्रोनद्वारे कीटकनाशके व खतांची फवारणी, ‘बँक ऑन व्हिल’ आणि ‘स्मार्ट टेहळणी’ अशा एकूण 18 सेवा कमी वेळात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकरी ड्रोन आणि सेन्सरचा (Sensors) उपयोग करून माती परीक्षण, फवारणी आणि खतांचे योग्य नियोजन करू शकतील, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल.
गावात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली असून, ‘टेलिमेडिसिन’च्या (Telemedicine) मदतीने गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक शिक्षणात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) आणि ‘स्मार्ट शिक्षण’ (Smart Education) यांचा उपयोग होऊन विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान मिळेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातनवरी गाव लवकरच देशात ‘रोल मॉडेल’ म्हणून नावारूपाला येईल, अशी आशा व्यक्त केली. तसेच या सेवांचा योग्य वापर करून येत्या वर्षात या गावाने देशातील सर्वात प्रगतीशील गाव म्हणून नाव कमवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लवकरच प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 3,500 गावे स्मार्ट व इंटेलिजंट केली जाणार आहेत.