बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते त्या लिफ्टचा अपघात झाला आहे. या अपघातात मनोज जरांगे पाटील याच्यासह त्यांचे सहकारी बचावले आहेत. ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. त्यानंतर एकच खळबळ आणि धावपळ उडाली ही घटना बीड शहरात घडली. जरांगे पाटील बीड दौऱ्यावर आहेत. त्यावेळे रुग्णालयात भेटण्यासाठी ते गेले होते. त्याच वेळी हा अपघात झाला.
लिफ्ट कोसळली तेंव्हा जरांगे त्या लिफ्टमध्ये होते. त्यांचे सहकारीही त्यांच्या सोबत होते. या अपघतात ते सुखरूप बचावले आहेत. बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये ते गेले होते. रुग्णाच्या भेटीसाठी ते रुग्णालयात आले होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.लिफ्टमध्ये अचानक तांत्रिक अपघात झाला. त्यामुळे लिफ्ट पहिल्या माळ्यावरून थेट खाली कोसळली.
लिफ्ट कोसळल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली. शिवाय काही वेळ भितीचं वातावरण निर्माण झालं होते. लिफ्ट कोसळली त्यावेळी लिफ्टचे दरवाजे हे बंदच होते. आतमध्ये जरांगे आणि त्यांचे सहकारी फसले होते. त्यामुळे लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटलांसह त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.