मठातील महादेवी हत्तीण परत द्या ४५ कि.मी. मूक यात्रेतून हजारोंची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील मठातील महादेवी हत्तीण परत द्या, अशी हाक देत नांदणी ते कोल्हापूर मूक आत्मक्लेश पदयात्रेत सर्वधर्मीय हजारो नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले होते. ‘एक रविवार महादेवीसाठी’ असे म्हणत लहान मुले, वयोवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. ‘महादेवीला परत आणूनच गप्प बसू,’ असा इशारा देत सर्वांनी ४५ किलोमीटर पायी येत दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आत्मक्लेश यात्रेच्या दणक्यानंतर माधुरीला परत आणण्याच्या कायदेशीर पर्यायांवर विचार सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली आहे.

नांदणी मठातील महादेवी हत्तीण गुजरात येथील ‘वनतारा‘ येथे नेल्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटकातील भक्तांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला. यातूनच ‘एक रविवार महादेवीसाठी‘ या मोहिमेंतर्गत पहाटे पाच वाजता नांदणीपासून पदयात्रेला सुरुवात झाली. यात्रा पुढे-पुढे जाईल तशी गर्दी वाढत गेली.

महादेवी ऊर्फ माधुरी हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक धार्मिक कार्यात तिला महत्त्वाचं स्थान होतं. ज्या वनतारा केंद्रामध्ये महादेवीला पाठवलंय ते हत्ती केंद्रच बेकायदेशीर आहे. याबाबत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. महादेवीला परत आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. राजू शेट्टी, माजी खासदार

कोल्हापुरात चार किलोमीटरची रांग पदयात्रेचे एक टोक कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, तर दुसरे टोक पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हॉटेल येथेपर्यंत होते. साधारणतः चार किलोमीटरची रांग लागली होती.

‘महादेवी’ येत नाही तोपर्यंत शाळा बंद,  माधुरी हत्तिणीला नेल्याबद्दल शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. हा विषय भावनिक झाल्याने ‘महादेवी’ येत नाही तोपर्यंत शाळेला जाणार नसल्याचा निर्धार शिरोळमधील अनेक गावांतील विद्यार्थ्यांनी केला आहे.

कोल्हापूर : ‘महादेवी’ हत्तीण प्रकरणामध्ये शासनाने कुठलाही थेट आदेश दिलेला नाही. मात्र, नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणी मुंबईत उद्या, मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. या बैठकीनंतर ‘महादेवी’ प्रकरणी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापुरात महादेवी प्रकरणी मोर्चा निघाल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, मुळात हा शासनाचा निर्णय नाही. प्राण्यांविषयी काम करणारे कार्यकर्ते आणि संबंधित मठ यांच्यात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. यासाठी उच्च न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती नेमली. त्यांनी या महादेवी हत्तिणीसाठी नांदणीहून कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी मूक पदयात्रा काढण्यात आली फाटा परिसरात आत्मक्लेश यात्रेत वाहनांवर बसविलेले कृत्रिम हत्ती लक्ष वेधून घेत होते.