पुणे | ७ जानेवारी २०२६ : एक दृढ निर्धार, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता, एक गोष्ट स्पष्ट झाली – पुणेकरांनी आपली दिशा ठरवली आहे. साथ आणि मत केवळ राष्ट्रवादीला, हा संदेश हजारो नागरिकांनी दिला.

या रॅलीत पक्षाचे नेते, कार्यकर्ते, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी हातात राष्ट्रवादीचे झेंडे, घोषवाक्यांचे फलक आणि उत्साहाने भरलेले चेहेरे घेऊन प्रचार रॅलीला जो प्रतिसाद दिला, तो निवडणूकपूर्व वातावरणच बदलवणारा होता.

पुणे – महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा

अजित पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितलं की, “पुणे हे फक्त एक ऐतिहासिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र नाही, तर राज्याच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणारे शहर आहे. त्यामुळे पुण्याच्या कारभारासाठी सक्षम, निर्णयक्षम आणि जबाबदारी स्वीकारणारी लोकप्रतिनिधी हवीत – जे फक्त भाषणं न करता काम करतात.”

कामगिरीवर विश्वास, आश्वासन नव्हे तर अंमलबजावणीवर भर