बेस्ट महामंडळाची,The BEST Employees Co-operative Credit Society या निवडणुकी संदर्भात सर्वच कामगार संघटना आणि युनियन च्या प्रमुखांची बैठक काल दिनांक २ ऑगस्ट,२०२५ रोजी संपन्न झाली.या बैठकीमध्ये बेस्ट बहुजन एम्प्लॉज युनियन (रजी.) या आपल्या युनियनच्या वतीने मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होतो.
मुंबई शहराची जीव की प्राण असणारी बेस्ट कशा पद्धतीने वाचवू शकतो आणि बेस्टच्या कामगारांना कशा पद्धतीने न्याय मिळवून देऊ शकतो या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. सदर बैठकीच आयोजन उत्कर्ष श्रमिक युनियन चे अध्यक्ष आमदार श्री.प्रसाद लाड आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष श्री. प्रवीण दरेकर यांनी केले होते.
बेस्ट बहुजन एम्पलोयीज युनियन (रजी.) चे संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष-युथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भिमरत्न पॅंथर मनोजभाई संसारे यांनी बेस्ट कामगारांसाठी केलेल्या ऐतिहासिक योगदानाचा या बैठकी दरम्यान अनेक नेत्यांकडून वारंवार उल्लेख करण्यात आला.
बेस्ट (BEST – Brihanmumbai Electric Supply and Transport) हे मुंबई शहरासाठी एक महत्वाचे सार्वजनिक परिवहन आणि वीज वितरण महामंडळ आहे. हे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते. BEST मुंबई शहरात बस सेवा आणि वीज वितरण पुरवते.
बेस्ट महामंडळ सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लाईफ लाईन असून BEST जिवंत रहावी हीच भावना बैठकीच्या वेळेस बेस्ट बहुजन एम्प्लॉज युनियन (रजी.) च्या माध्यमातून मांडण्यात आली.
बेस्ट महामंडळाची निवडणुकी संदर्भात सर्वच कामगार संघटना आणि युनियन च्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली.
