Ajit Pawar Responds to Solapur Woman Officer Controversy : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजना कृष्णा यांच्यातील कथित वादावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी फोन करून कारवाई थांबवण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणावरून अनेक व्हिडिओही व्हायरल झाले असून, त्यावर खुद्द अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खन काय आहे प्रकरण ?माढा येथील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाची तक्रार मिळाल्यानंतर डीएसपी अंजना कृष्णा त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. त्यावेळी उत्खनन करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि तो फोन अंजना कृष्णा यांच्याकडे दिला.व्हायरल झालेल्या व्हिडिओंनुसार, अजित पवार यांनी फोनवरून अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्यास सांगितले. मात्र, अंजना कृष्णा यांनी फोनवर कोण बोलत आहे हे कसे कळणार, असा प्रतिप्रश्न केला. यामुळे अजित पवार संतापले आणि त्यांनी पुन्हा कॉल करून कारवाई थांबवण्यास सांगितले, त्यानंतरच कारवाई थांबली, असे सांगितले जाते. या घटनेमुळेच अंजना कृष्णा चर्चेत आल्या आहेत.व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर काय म्हणाले अजित पवार ?या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता. त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.”आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे.मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.”सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी…डीएसपी अंजना कृष्णा कोण आहेत ?मूळच्या केरळच्या असलेल्या अंजना कृष्णा यांनी 2023 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची सोलापूर ग्रामीणमध्ये पहिलीच पोस्टिंग झाली आहे. त्यांची ही पहिलीच मोठी कारवाई आणि त्यात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेला वाद यामुळे त्या सर्वत्र चर्चेत आहेत.राजकीय आरोप-प्रत्यारोपया घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. “एका महिला अधिकाऱ्याला धमकी देणे उपमुख्यमंत्र्यांना शोभत नाही,” असे दमानिया म्हणाल्या. त्यांनी अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी अजित पवारांचा बचाव केला आहे. “अजित पवार कामात दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांना झापतात. मात्र, महिला अधिकाऱ्याला झापल्याचे बोलणे चुकीचे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. या वादामुळे शेतकरी संघटनेसह इतर अनेक संघटनाही अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत.अजित पवार यांच्या व्हिडिओ संभाषणावर जनतेत तीव्र नाराजी आहे. सोशल मीडियावर काही लोक सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत. Post navigationChhagan Bhujbal: छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, OBC साठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा देत,मुस्लिम बांधवांसाठी अन्न व पाणी वाटप करण्यात आले