Arattai vs WhatsApp:  Zoho च्या ‘अरट्टाई’ ॲपमध्ये Meta ला नमवणारे 5 पॉवरफुल फीचर्स!

Arattai vs WhatsApp: “सोशल मीडियावर सध्या ‘मेड इन इंडिया’ मेसेजिंग ॲप ‘अरट्टाई’ (Arattai) ने धुमाकूळ घातला आहे.व्हॉट्सॲपमध्ये नसलेल्या 5 पॉवरफुल फीचर्समुळे हे ॲप मेटाच्या (Meta) जागतिक प्रतिस्पर्धकाला तगडी टक्कर देत आहे.

Arattai vs WhatsApp: “सोशल मीडियावर सध्या ‘मेड इन इंडिया’ मेसेजिंग ॲप ‘अरट्टाई’ (Arattai) ने धुमाकूळ घातला आहे. अनेक भारतीय युजर्स Zoho कंपनीच्या या ॲपला ‘WhatsApp किलर’ म्हणून पसंती देत आहेत. अरट्टाई मध्ये जाहिरात-मुक्त गोपनीयता, डेटा स्थानिक डेटा सेंटर्समध्ये साठवण्याची ग्वाही आणि थेट Zoom/Google Meet प्रमाणे ‘मीटिंग्ज’ शेड्युल करण्याची सुविधा आहे. यासह, व्हॉट्सॲपमध्ये नसलेल्या 5 पॉवरफुल फीचर्समुळे हे ॲप मेटाच्या (Meta) जागतिक प्रतिस्पर्धकाला तगडी टक्कर देत आहे.

कोणत्या बाबतीमध्ये अरट्टाई ॲप हे व्हॉट्सॲपपेक्षा सरस ठरतंय हे पाहूया

WhatsApp मध्ये नसलेली ‘अरट्टाई’ ची 5 खास वैशिष्ट्ये:

1. मीटिंग्स (Meetings)

WhatsApp च्या व्हिडिओ कॉलिंग फीचरला मागील काही वर्षांमध्ये अनेक अपडेट्स मिळाले असले तरी, ते ‘अरट्टाई’ मध्ये असलेल्या ‘मीटिंग्स’ फीचरच्या जवळपासही नाही. या फीचरमुळे युजर्स आपल्या मेसेजिंग ॲपमधूनच Google Meet आणि Zoom प्रमाणे मीटिंग्स आयोजित करू शकतात.

‘अरट्टाई’ ॲपच्या बॉटम डॉकवर (Bottom Dock) असलेल्या ‘मीटिंग्स’ फीचरमध्ये इन्स्टंट मीटिंग तयार करणे, मीटिंग जॉईन करणे आणि नंतरसाठी मीटिंग शेड्युल (Schedule) करण्याचे पर्याय आहेत.

या मेनूमध्ये युजर्स त्यांच्या सर्व शेड्युल केलेल्या आणि मागील मीटिंग्ज (Previous Meetings) पाहू शकतात.

2. पॉकेट (Pocket)

WhatsApp वर अनेक युजर्स महत्त्वाच्या माहितीची नोंद ठेवण्यासाठी स्वतःलाच मेसेज पाठवतात. ‘अरट्टाई’ या फीचरला एक पाऊल पुढे घेऊन जातो. यात ‘पॉकेट’ (Pocket) नावाचे खास फीचर आहे, जे युजरचे वैयक्तिक ‘क्लाउड स्टोरेज’ (Cloud Storage) म्हणून काम करते. येथे युजर्स मेसेज, मीडिया आणि इतर माहिती सेव्ह करू शकतात.

3. मेन्शन्स (Mentions)

WhatsApp वर कोणत्या ग्रुपमधून किंवा चॅटमधून नोटिफिकेशन आले हे पाहणे काहीवेळा त्रासदायक ठरू शकते. मात्र, ‘अरट्टाई’ मध्ये तसे नाही. या ॲपमध्ये Slack प्रमाणे ‘मेन्शन्स’ (Mentions) नावाचा एक स्वतंत्र विभाग आहे, ज्यात युजरला टॅग (Mention) केलेले सर्व मेसेज एकाच ठिकाणी दिसतात.

4. जाहिरातींचा अभाव (No Ads) आणि डेटा गोपनीयता (Data Privacy)

‘अरट्टाई’ मध्ये सध्या कोणत्याही जाहिराती नाहीत आणि कंपनीने युजर्सचा डेटा जाहिरातींसाठी वापरणार नाही याची ग्वाही दिली आहे. याउलट, WhatsApp ने ‘अपडेट्स’ टॅबमध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली आहे आणि जाहिरात उद्देशांसाठी आपला काही डेटा मूळ कंपनी Meta सोबत शेअर करते.

‘अरट्टाई’ युजर्सशी संबंधित सर्व डेटा देशातील डेटा सेंटर्समध्ये (Data Centers) साठवतो.

महत्त्वाची माहिती: ‘अरट्टाई’ व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल्ससाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (End-to-End Encryption) प्रदान करतो, परंतु साध्या टेक्स्ट मेसेजसाठी ते अद्याप पूर्णपणे संरक्षित (Protected) नाही. या तुलनेत, WhatsApp टेक्स्ट मेसेज आणि कॉल्स दोन्हीसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन पुरवते.

5. एआयचा सक्तीचा वापर नाही (No Forced AI)

Meta ने गेल्या काही महिन्यांमध्ये युजर्सना गरज नसतानाही WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एआय (AI) फीचर्स सक्तीने जोडले आहेत. याउलट, ‘अरट्टाई’ मध्ये एआय फीचर्सचा सक्तीचा समावेश करण्यात आलेला नाही.

चेन्नईच्या ‘झोहो कॉर्पोरेशन’ने विकसित केलेले ‘अरट्टाई’ (Arattai) हे ‘मेड इन इंडिया’ मेसेजिंग ॲप सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Arattai app News : चेन्नईच्या ‘झोहो कॉर्पोरेशन’ने विकसित केलेले ‘अरट्टाई’ (Arattai) हे ‘मेड इन इंडिया’ मेसेजिंग ॲप सध्या प्रचंड चर्चेत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘स्वदेशी ॲप’ वापरण्याचे आवाहन केल्यानंतर, या ॲपने ॲपलच्या ॲप स्टोअरवर थेट पहिल्या क्रमांकावर (Top Spot) झेप घेतली आहे. यामुळे व्हॉट्सॲपला मोठी टक्कर मिळत आहे. गेल्या 3 दिवसांत या प्लॅटफॉर्मच्या ट्रॅफिकमध्ये तब्बल 100 पटीने वाढ झाली असून, हे ॲप व्हॉट्सॲपप्रमाणेच सर्व सुविधा देते.

‘व्हॉट्सॲप’ने (WhatsApp) आपल्या गोपनीयता धोरणांमध्ये (Privacy Policy) बदल जाहीर केल्यानंतर, जानेवारी 2021 मध्ये ‘झोहो’ने हे ॲप लाँच केले होते. मात्र, गेल्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी या ॲपला पाठिंबा देत ते वापरण्याचे आवाहन केले.

मंत्री प्रधान यांनी ‘एक्स’ (X) (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, “झोहोने विकसित केलेले ‘अरट्टाई’ इन्स्टंट मेसेजिंग ॲप फ्री (Free), वापरण्यास सोपे (Easy-to-use), सुरक्षित (Secure, Safe) आणि ‘मेड इन इंडिया’ आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ‘स्वदेशी’ स्वीकारण्याच्या आवाहनानुसार, मी सर्वांना मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले राहण्यासाठी भारत-निर्मित ॲप्स वापरण्याची विनंती करतो.”

काय आहे ‘अरट्टाई’?

  • ‘अरट्टाई’ या तमिळ शब्दाचा अर्थ ‘साध्या गप्पाटप्पा’ (casual chat) असा आहे. ‘व्हॉट्सॲप’ प्रमाणेच ‘अरट्टाई’ वापरकर्त्यांना खालील सुविधा पुरवते
  • टेक्स्ट आणि व्हॉइस मेसेजेस पाठवणे.
  • व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स. (कॉलसाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन (End-to-end Encryption) उपलब्ध).
  • फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करणे.
  • स्टोरीज (Stories), ग्रुप्‍स (Groups) आणि चॅनल्स (Channels) तयार करणे.
  • स्मार्टफोन, टॅबलेट आणि डेस्कटॉपसह मल्टि-डिव्हाइस सपोर्ट (Multi-device Support). (एकावेळी जास्तीत जास्त 5 डिव्हाइसेसवर वापरण्याची सोय).
  • याशिवाय, वापरकर्ते इतर चॅट प्लॅटफॉर्मवरील संभाषणे (Conversations) देखील ‘अरट्टाई’वर इम्‍पोर्ट (Import) करू शकतात.

सुरक्षेचा मुद्दा

‘अरट्टाई’मध्ये कॉलसाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुविधा असली तरी, मेसेजेसना (Messages) अजूनही पूर्ण सुरक्षा (एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन) मिळालेली नाही. मेसेजेससाठी ही सुविधा लवकरच लागू कंपनीची योजना आहे.

वाढलेला उत्साह आणि पायाभूत सुविधांवर ताण

या वाढत्या लोकप्रियतेमुळे ‘अरट्टाई’च्या वापरात मोठी वाढ झाली आहे. झोहोचे सह-संस्थापक श्रीधर वेम्बू (Sridhar Vembu) यांनी सोमवारी सांगितले की, फक्त 3 दिवसांत प्लॅटफॉर्मच्या ट्रॅफिकमध्ये 100 पटीने वाढ झाली आहे. दररोज नवीन साइन-अप्सची संख्या 3,000 वरून 3,50,000 वर पोहोचली आहे.