
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर दबंग अधिकाऱ्याची स्पेशल कहाणी
महाराष्ट्र Article
बीड : एखाद्या क्षेत्रात काम करत असताना दुसऱ्या क्षेत्रात जाऊन नावलौकिक करणारे लोक कमी असतात. त्यापैकीच बीड येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्यावर असणारे सचिन पांडकर हे एक आहेत. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर ते खासगी कंपनीत नोकरी करत होते. मात्र त्यानंतर त्यांनी नोकरी सोडत चक्क मोठा अधिकारी होण्याचं स्पप्न पाहिलं आणि ते अखेर सत्यातही उतरवलं आहे. पांडकर हे आता अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बीडमध्ये कार्यरत आहेत. खासगी कंपनीतील नोकरी सोडली सचिन पांडकर हे बीड पोलीस दलामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर कर्तव्य बजावत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे पांडकर यांचं मूळ गाव आहे. बीई मेकॅनिकलमध्ये त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका खाजगी कंपनीमध्ये तब्बल सात वर्ष नोकरी देखील केली. मात्र त्यानंतर नोकरी करताना काही चढउतार त्यांना जाणवले आणि त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे ठरविले. हातची नोकरी सोडून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
पहिल्यांदा मिळाली पीएसआयची पोस्ट सचिन पांडकर यांचे वडील रमेश आणि आई हे दोघेही शिक्षक असल्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होते. इंजिनियरची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेकडे वळताना घरच्यांनाही विश्वासात घेतले. 2005 रोजी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. या काळात स्पर्धा परीक्षेसाठी एका पोलीस अधिकाऱ्याचे मार्गदर्शन मिळाले. दोन वर्षानंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली, असे पांडकर यांनी सांगितले. एका जाहिरातीनं बदललं आयुष्य, रसवंतीमध्ये काम करणारा मुलगा बनला कॉमेडी स्टार! अन् डीवायएसपी झालो पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतरही अभ्यास सुरूच ठेवला. पाच वर्षाच्या अथक परिश्रमानंतर डीवायएसपी पदाची परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी मला काम करण्यास मिळाले आणि मी आता अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतंही यश अवघड नाही, असे अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर सांगतात. सचिन पांडकर यांचा इंजिनियर ते अप्पर पोलीस अधीक्षक पदापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||


