Skip to content

Menu

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

November 2025
MTWTFSS
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress

नंबर १ मराठी न्यूज
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा
You are here :
  • Home
  • मुख्यपृष्ठ
  • एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या या शासकीय ॲपद्वारे रोजगाराची संधी एसटी महामंडळाचे ‘छावा राइड’ ॲप
Written by August 5, 2025

एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या या शासकीय ॲपद्वारे रोजगाराची संधी एसटी महामंडळाचे ‘छावा राइड’ ॲप

मुख्यपृष्ठ Article

मुंबई : चालकांना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्रालयातील आपल्या दालनात केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटर पॉलिसीच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सरनाईक म्हणाले की, राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि खाजगी कंपन्यांच्या शोषणातून प्रवासी व चालकांना मुक्त करणे हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. बस, रिक्षा, टॅक्सी व ई-बस (e-bus) या वाहन सेवांसाठी हे ॲप सुरू करण्याचे निश्चित केले आहे. हे ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळामार्फत सुरू केले जाईल. भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणे आणि प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा देणे हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय ॲप एसटी महामंडळाने चालवणे योग्य राहील असे ते म्हणाले.

“छावा राईड” नावावर एकमत

या ॲपला ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’, ‘महा-गो’ किंवा ‘छावा राईड’ यापैकी एखादे नाव देण्याबाबत चर्चा झाली. नवीन शासकीय ॲपला “छावा राईड ॲप” हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

सरनाईक पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्वांनुसार या ॲपची नियमावली अंतिम टप्प्यात आहे. सध्या खाजगी संस्था अनाधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात, त्यासाठी त्या कंपन्या चालक व प्रवाशांची लूट करीत आहेत. एसटी महामंडळाकडे यंत्रणा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ व जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित करून चालवण्यासाठी एसटी महामंडळाला दिल्यास त्याचा फायदा प्रवाशांबरोबर एसटी महामंडळालाही होईल.

बेरोजगार मराठी तरुणांसाठी मुंबै बँकेचा पुढाकार

एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या या शासकीय ॲपद्वारे रोजगाराची संधी मिळणाऱ्या मराठी तरुण-तरुणींना मुंबै बँकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. या तरुणांना वाहन खरेदीसाठी मुंबै बँकेकडून 10% व्याजदराने कर्ज दिले जाईल. तसेच, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांमार्फत 11% व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे. त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे आहे.

You may also like

Nashik City News: नाशिकमध्ये ‘आफ्रिकन स्वाईन फिव्हर’चे संकट ! ‘बाधित क्षेत्रातील’ 10 किमी परिसरात कडक निर्बंध लागू

November 22, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार

November 20, 2025

बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना आभार पत्र शाळेच्या जागेवरच ‘आदर्श मराठी मॉडेल स्कूल’ उभारण्याची मागणी नगरविकास मंत्री समवेत बैठक आयोजन मागणी!!

November 20, 2025
Tags: Mumbai

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

November 2025
MTWTFSS
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress