मोठी बातमी ! भारताला मोठा झटका, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली सही, अधिसूचना जारी

अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. सुरूवातीला भारताकडून सांगण्यात आले की, आम्ही चर्चा करत आहोत, चर्चा अजून संपलेली नाहीये. काहीतरी मार्ग निघेल. मात्र, आता भारताला चांगलाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.

आता भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आलीये. 27 ऑगस्ट 2025 पासून दुपारी 12 वाजून 1 मिनिटाला टॅरिफची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकाकडून आता परत सांगण्यात आलंय की, भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे रशियाला मोठा धक्का बसणार आहे.

रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱ्या चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला नाही. डोनाल्ड ट्रम्प सरकारचे स्पष्ट म्हणणे आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेनच्या युद्धाविरोधात पैसा पुरवत आहे. ब्राझील आणि भारतावर हा टॅरिफ लावला आहे. भारत हा 87 बिलियन डॉलर अमेरिकेत निर्यात करतो. त्यामुळे या टॅरिफचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. भारताने देखील अमेरिकेवर टीका केली आहे.

टॅरिफचा वाद वाढताना दिसत आहे. आता भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफच्या निर्णयावर सह्या देखील झाल्या आहेत. यासोबतच अमेरिकेकडून भारताला अजूनही धमकी दिली जात आहे. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी बंदी केली नाही तर अधिक टॅरिफ लागू केला जाऊ शकतो. अमेरिकेला सुरूवातीला वाटले की, भारत टॅरिफच्या धमकीनंतर लगेचच रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करेल. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही.

उलट अमेरिकेने भारताला टॅरिफचा धमकी दिल्यानंतर भारताने रशियासोबत अधिक करार केले. भारताकडून स्पष्ट करण्यात आले की, भारतीय तेल कंपन्यांना स्वस्त तेल कुठेही मिळाले तरीही ते खरेदी करू शकतात. हेच नाही तर आमच्या वस्तू खरेदी करायच्या नसतील तर नका खरेदी करू असेही भारताने यावेळी अगदी स्पष्ट सांगितले. आता भारत अमेरिकन कंपन्यांवर काय कारवाई करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अमेरिकन कंपन्या या भारतीय बाजारपेठेत मोठी कमाई करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची संकेत भारताकडून देण्यात आली आहेत.