नवीन नंबर प्लेटसाठी या फसव्या वेबसाईटला बळी पडू नका असं आवाहन नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केलं आहे. तसेच नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करताना फसवणूक टाळण्यासाठी नेमकी अधिकृत प्रक्रिया काय आहे हे देखील बीबीसी मराठीसोबत बोलताना समजावून सांगितलं.
- https://transport.maharashtra.gov.in ही शासकीय वेबसाईट आहे. ज्या वेबसाईटवर gov.in असं दिसतं ती शासकीय वेबसाईट आहे हे लक्षात ठेवायला हवं.
2. शासकीय वेबसाईटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला एचएसआरपी नावाचा ब्लॉक दिसतो. त्यावर क्लिक केल्यानंतर एक लहान विंडो येतो. यामध्ये सर्व कार्यालयाची नावं दिसतात.
3. आपली गाडी ज्या ठिकाणी आहे ते परिवहन विभागाचं कार्यालय निवडायचं. तुमची गाडी ग्रामीणची असेल आणि सध्या गाडी शहरी भागात असेल तरी शहरातलं कार्यालय निवडून नंबर प्लेटसाठी अप्लाय करता येतं.
4. त्यानंतर आपल्याजवळ असलेल्या आरसीवरून रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, चेसिस नंबर, इंजिन नंबरचे शेवटचे पाच पाच आकडे टाकायचे आणि मोबाईल नंबर टाकायचा.
5. त्यानंतर कॅपचा टाकून विंडो पुढे सरकते. याठिकाणी वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या मालकाचं नाव दिसतं.
6. यानंतर शुल्क भरण्यासाठी एक विंडो येते. त्यावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येतो. त्यासाठीही वाहनानुसार शुल्क निर्धारित केलं आहे.
7. दुचाकीसाठी 450+18 टक्के जीएसटी म्हणजे 531 रुपये, चारचाकी आणि जड वाहनांसाठी 745+18 ट्क्के जीएसटी आणि तीनचाकी वाहनांसाठी 500 +18 टक्के जीएसटी असं शुल्क निर्धारित करण्यात आलं आहे. यात नंबर प्लेटची होम डिलिव्हरी हवी असेल तर त्याचं वेगळं शुल्क भरावं लागतं. पण, सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवायची असेल तर कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. यापेक्षा कोणी जास्त शुल्क घेत असेल तर ती फसवणूक असू शकते. कोणी अशी फसवणूक करत असेल तक्रार करण्याचं आवाहन विजय चव्हाण यांनी केलं आहे.
8. शुल्क भरल्यावर वाहनधारकाच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो टाकल्यानंतर होम डिलिव्हरी पाहिजे की सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवायची आहे हे पर्याय विचारले जातील. आपल्या सोयीनुसार पर्याय निवडायचा आहे.
9. यानंतर नंबर प्लेट बसविण्याची तारीख, वेळ दिली जाते.
10. त्याची पावती तयार होऊन आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ही पावती पाठवली जाते.
11. कोणाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर अशा वाहनधारकांसाठी परिवहन विभागात हेल्प डेस्क तयार करण्यात आला आहे. तिथं जाऊन वाहनधारकांना रजिस्ट्रेशन करता येईल. पण, यावेळी रजिस्ट्रेशन नंबर गरजेचा असतो त्यामुळे वाहनाची आरसी सोबत ठेवणं गरजेचं आहे. पण, परिवहन विभागाच्या बाहेर असणाऱ्या दलालाकडून देखील फसवणूक होऊ शकते. त्यामुळे दलालांकडे न जाता थेट परिवहन विभागात यावं असं आवाहनही विजय चव्हाण यांनी केलं आहे.
शासकीय वेबसाईट : https://transport.maharashtra.gov.in/1222/Apply-High-Security-Registration-Plate-Online
(HSRP) बसवितांना वाहन मालकांकडून वारंवार उपस्थित होणारे प्रश्न 👇🏻
https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/HSRP-FAQ-Marathi.pdf
24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 ( टोल फ्री क्रमांक )