देशात आणि राज्यात शिष्यवृत्तींचा खजिना उपलब्ध आहे, पण अनेकांना याची माहितीच नसते. योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास आर्थिक अडचणींची तमा न बाळगता शिक्षण पूर्ण करता येते.
१. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती:
NSP (National Scholarship Portal) वर अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत जसे की PM Scholarship, Post Matric Scholarship, Merit cum Means आदि.
अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता अटी व्यवस्थित तपासा.
२. महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती:
mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवरून अनेक शिष्यवृत्ती मिळतात.
SEBC, SC, ST, OBC, EBC यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत.
३. खासगी शिष्यवृत्ती संधी:
Tata Trusts, Reliance Foundation, L&T Build India, LIC Golden Jubilee Scholarship इ. अनेक संस्था आर्थिक मदत करतात.
४. योग्य कागदपत्रे तयार ठेवा:
जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते, आधार लिंकिंग इत्यादी बाबी आधीच पूर्ण करून ठेवा.
५. माहितीचे स्रोत:
WhatsApp ग्रुप्स, YouTube Channels, सरकारी संकेतस्थळे, कॉलेज Notices या ठिकाणी लक्ष ठेवा.