नवी दिल्लीतील जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे कव्हरेज करत असताना एका महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन आणि लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप असलेल्या दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्याला मोठी पदोन्नती देण्यात आली आहे. कॅनॉट प्लेसचे एसीपी विवेक भगत यांना सोमवारी अतिरिक्त डीसीपी (Addl DCP) पदावर बढती देण्यात आली आहे. एका बाजूला पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप असताना दुसरीकडे त्याला बक्षीस म्हणून पदोन्नती दिल्याने पत्रकार वर्तुळात आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे.शनिवारी (३ ऑक्टोबर) जंतरमंतरवर निवडणूक आयोगाविरुद्ध निदर्शने सुरू असताना, महिला पोलिस कर्मचारी अनुपस्थित असल्याबद्दल जा विचारणा करणाऱ्या महिला पत्रकाराला एसीपी विवेक भगत यांनी धक्काबुक्की करत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तीन महिला पत्रकारांनी अधिकृत तक्रार दाखल केली असून, हा तपास गुन्हे शाखेकडे (Crime Branch) वर्ग करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही संबंधितांवर एफआयआर (FIR) दाखल न झाल्याने स्वतंत्र पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत संसद मार्ग पोलिस ठाण्याबाहेर सलग दोन दिवस धरणे आंदोलन केले.विरोधी पक्षांचा हल्लाबोल आणि प्रेस क्लबची टीकाया घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले आहेत. “महिला पत्रकारांनी सुरक्षेची मागणी करणाऱ्या पोलिसांवरच छळाचे गंभीर आरोप केले आहेत, पण पोलिस साधी FIR देखील नोंदवत नाहीत,” असे राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.तसेच, ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ने (Press Club of India) या संपूर्ण प्रकरणावर तीव्र निषेध व्यक्त केला असून लोकशाहीत पत्रकारांना भीतीशिवाय काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून ही एक नियमित पदोन्नती प्रक्रिया असल्याचे सांगितले जात असले, तरी आरोपी अधिकाऱ्याला मिळालेल्या पदोन्नतीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारविरोधातील रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Post navigationमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात निदर्शने; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला बजावली नोटीस काँग्रेसचा मोठा निर्णय! देशभरात ८०० शहरांमध्ये राबवणार ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम आणि ‘चंदा चोरी’विरोधात तीव्र आंदोलने