
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक संपन्न
नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे संपन्न झाली.
यावेळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत होत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा सुरक्षित होईल या दृष्टीने नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत गर्दीचे नियोजन, वाहतूक, रस्ते, नदी-उपनद्यांचे शुध्दीकरण, पायाभूत सुविधा यासह साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करून कामांना गती द्यावी, असे निर्देश यावेळी दिले.
याप्रसंगी आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महानगर पालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||


