नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी, गुन्हेगारी रोखणे, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी आज पोलीस आयुक्तालयात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली.
बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या आदेशानुसार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे निर्देश दिले. रात्रीची गस्त वाढविण्याचे आदेश, वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय, अल्पवयीन गुन्हेगारी अशा प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. नाशिक हे शांत आणि सुरक्षित शहर राहावे हीच अपेक्षा असून, या निर्णयांची अंमलबजावणी नागरिकांना प्रत्यक्ष दिसून येईल.
अल्पवयीन गुन्हेगारी संदर्भात राज्यस्तरावरून कायद्यात काय बदल केला जाऊ शकतो हा मुद्दा देखील शासनाच्या विचाराधीन आहे. येणाऱ्या काळात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले जाईल. कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला केली आहे.