नाशिक शहराचे तिन्ही आमदार मिळून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि नाशिककरांच्या जीवनमानाशी निगडित महत्त्वाच्या प्रश्नांवर निवेदन दिले.
1️⃣ नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी
• अलिकडच्या काळात नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
• यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस यंत्रणेची ताकद वाढवावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच अधिकाधिक पोलीस कर्मचारी नेमावेत अशी मागणी केली.
2️⃣ सिंहस्थ कुंभमेळा निधी
• 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा आहे.
• या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासासाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर व्हावा, जेणेकरून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि पर्यटकांच्या सोयीसुविधा वेळेवर पूर्ण करता येतील.
3️⃣ नाशिक–पुणे रेल्वे मार्ग (व्हाया संगमनेर)
• नाशिक आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
• हा मार्ग संगमनेर मार्गे पूर्ण करावा, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, उद्योगधंद्यांना चालना मिळेल तसेच शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी देवाणघेवाण अधिक सुलभ होईल.