नाशिक : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी पाटील यांना निवेदन दिले दिंडोरी तालुक्यातील मौजे निळवंडी व हातनोरे या दोन गावांमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठी नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रशासकीय दुर्लक्षाच्या विरोधात देऊन तातडीने कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. सध्या या दोन्ही गावांचा कारभार पिंपळनेर व राशेगाव येथील डिशनल तलाठ्यांकडे देण्यास आला आहे परंतू ,सातबारा उतारे, फेरफार नोंदी, पिकांची नोंद यांसारख्या मूलभूत महसूल कामांसाठी शेतकऱ्यांना इतर गावांत हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे गावात तलाठी कार्यालय अस्तित्वात असतानाही तलाठी अनुपस्थित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तलाठी अनुपस्थित असल्याने अनेक कामे प्रलंबीत आहे त्या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी दिंडोरी तालुका अध्यक्ष प्रवीण गवारे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख संजय गवारे, महाराष्ट्र प्रवक्ते मच्छिंद्र मगर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेश नन्नावरे यांच्यासह निळवंडी येथील ग्रामस्थ कपिल गवारे, चिंतामण शार्दुल तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, तलाठी नसल्यामुळे महसूल प्रशासनाची कामे ठप्प होत असून शासनाच्या सेवा गावकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तातडीने कायमस्वरूपी तलाठी नियुक्त न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीने दिला आहे.असे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने प्रेस नोट नुसार कळवण्यात आले Post navigationसाताऱ्यात मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने चक्क एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला बार्टीकडून अनुसूचित जातीच्या युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत सी-डॅकच्या सहकार्याने पीजी सर्टिफिकेट प्रोग्रॅम