वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदन

नाशिक  : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्या बाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. तृप्ती सोनवणे मॅडम यांना निवेदन दिले.

त्यात सोमवार दिनांक ०४/०८/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता स्थळ “हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कला व क्रिडा मैदान” श्री सप्तश्रृंगी देवी मंदिराचे शेजारी, राणेनगर-राजीवनगर, मुख्य रस्ता, राजीवनगर येथे संभाजी भिडे यांचे व्याख्यान विषय भारतीय स्वतंत्र्य आणि आपण व हिंदवी स्वराज्य सुवर्णसिंहासन व्याख्यान “श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान” यांनी आयोजित केलेले आहे.

परंतु संभाजी भिडे हे त्यांच्या व्याख्याने व भाषणांतुन धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करतात व युवा वर्गामध्ये हिंदुत्त्वाचे नावाखाली जातीवाद पसरवुन युवा वर्गाला नैतिकतेच्या मार्गावरुन दिशाभुल करुन त्यांना माथेफिरु बनवुन त्यांचेकडुन समाजात तेढनिर्माण होईल असे कृत्य करण्यास भाग पाडतात. त्यामुळे या पुर्वी संभाजी भिडे यांचे विरुध्द नाशिक जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी केलेल्या भाषणांबद्दल व वक्तव्यांबद्दल विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

दि.०४/०८/२०२५ रोजी संभाजी भिडे यांचे वक्तव्य होणार असल्यामुळे सामाजिक शांततेस तसेच जातीय धोका पोहोचणार आहे. अशा व्यक्तीस आपण वक्तव्य करण्यास परवानगी दिल्यास सदरचा कार्यक्रम हा पार पाडल्यास समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व अशातच काही अनपेक्षीत घटना घडल्यास किंवा काही विघातक कृत्य झाल्यास त्यास संपुर्णतः पोलीस प्रशासन जबाबदार असेल.

वरील कारणांचा विचार होऊन सोमवार दिनांक ०४/०८/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता स्थळ “हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कला व क्रिडा मैदान श्री सप्तश्रृंगी देवी मंदिराचे शेजारी, राणेनगर-राजीवनगर, मुख्य रस्ता, राजीवनगर येथे संभाजी भिडे यांचे व्याख्यानांस बंदी घालण्यात यावी अन्यथा होणाऱ्या सर्व परिणामास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.

वरिष्ठ पुलिस निरीक्षक तृप्ति सोनवाने मॅडम यांना निवेदन देण्यात आले त्यांनी आश्वासन दिले की याची दखल घेतली जाईल.  निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उर्मिला ताई गायकवाड, राहुल कांबळे, जितेश शार्दुल,अरुण शेजवळ, विवेक तांबे,ताराचंद मोतमल, सुनील वाघ,मनोज बागुल, आप्पाराव कांबळे आदी उपस्थित होते…