सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळवून दिल्या मुळे वंचित ब आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे अभिनंदन

नाशिक प्रतिनिधी : परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर एका आठवड्यात मृत्यूला कारणीभूत असलेल्या संबंधित पोलिसांवर मुबई उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु 30 जुलै रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला धक्का देत उच्च न्यायालयाचा निकाल कायम करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

या मृत्यू प्रकरणी आता पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि सोमनाथचे कुटुंब काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने सोमनाथ यांच्या खुणाच्या प्रकरणात कोण पोलीस दोषी आहेत ते पाहावे, व त्याची जबाबदारी निश्चित करून  संबंधित नावे या गुन्ह्यात समाविष्ट करावीत असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळवून दिल्या मुळे वंचित ब आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच युवा आघाडीच्या वतीनेच्या सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या वतीने अभिनंदन केले .

त्याबद्दल नाशिक येथे 4 ऑगस्ट 2025 रोजी शालिमार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर वंचित बहुजन आघाडी तसेच वंचित युवा आघाडी सम्यक विद्यार्थी संघटना यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने न्यायाची लढाई लढून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टात न्यायाचा लढा महाराष्ट्र सरकारच्या विरूद्ध लढून न्याय मिळवून दिल्या बददल ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन आणि पुणे कोथरूड पोलीसांनी बौध्द मुलींवर केलेल्या अन्याया विरूद्ध तसेच नाशिक येथे संभाजी भिडे यांनी अभ्रद वक्तव्य करून जाती धर्मात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पण धडा शिकविण्याचे उत्तर देण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच युवा आघाडीच्या वतीनेच्या सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या वतीने देऊन वंचित ब आघाडीचे चे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा ॲड. प्रकाश आंबडेकर यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला वंचित ब आघाडीचे जेष्ठ नेते दिपचंद दोंदे वामन गायकवाड बाळासाहेब शिंदे, संजय साबळे काकळीज शार्दुल भंडारी गांगुर्डे व युवा आडीचे साळवे पगारे भवर तर वं ब . महिला आघाडीच्या जि अध्यक्षा उर्मिला गायकवाड महिला पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

नाशिक प्रतिनिधी : शशिकांत भालेराव