
Mahar Watan Land नाशिक वतनाची जमीन लाटली; नाशिकरोड व जेलरोडचे व्हाईट कॉलर ‘भूमाफिया’ रडारवर
नाशिक | प्रतिनिधी | Nashik : सन २०१० पासून जेलरोड व नाशिकरोड भागातील महार वतनाच्या जमिनी ( Mahar Watan Land) परस्पर लाटून विक्री केल्याप्रकरणात अखेर पंधरा वर्षांनी ‘व्हाईट कॉलर’ भूमाफियांवर उपनगर पोलिसांत ( Upnagar Police) गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात माजी नगरसेविकेचा पती, एक डॉक्टर, माजी प्रभाग सभापती व राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचे नाव संशयितांच्या यादीत समोर आले असून त्यांना ताब्यात घेऊन पोलीस सखोल तपास करणार आहेत.
भारतीय बहुजन सेनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत घोडेराव, नाशिकरोड प्रभाग समितीचा माजी सभापती व नगरसेवक पवन चंद्रकांत पवार, त्याचा भाऊ विशाल चंद्रकांत पवार, माजी ऊर्जामंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचा नाशिक जिल्हाध्यक्ष मोहन गायकवाड, माजी नगरेसविका सुषमा पगारे यांचा पती रवी पगारेसह, विलास विठ्ठल लोखंडे, जगदीश जयदेव गांगुर्डे व इतर अशी संशयितांची नावे आहेत. त्यापैकी पवन चंद्रकांत पवार, विशाल चंद्रकांत पवार व विलासराज गायकवाड हे सराईत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
युवराज भिकाजी गांगुर्डे ( ७०, रा. राहुलनगर, आगरटाकळी रोड, उपनगर ) या मजुराने फिर्याद दाखल केली आहे. त्याअन्वये दसक परिसरात १७ ऑगस्ट २०१० ते २०१८ या कालावधीत डॉ. प्रशांत घोडेराव व जगदीश गांगुर्डे यांनी फिर्यादी युवराज यांचा विश्वास संपादन केला. त्यांची दसक येथील सर्वे नं. ७८/३, ७९/११, ७९/१२, ७९/१४, ७९/१५ आणि ७९/१६ मधील महार वतनाची २ हेक्टर २० आर शेतजमीन (Land) शासनाच्या परवानगीशिवाय विक्री किंवा हस्तांतरीत करता येत नाही हे माहीत असताना देखील संगनमत केले.
शंभर व पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर साठेखत / विसार करारनामा करून फसवणूक केली. कोणताही कायदेशीर व्यवहार न करता वरील जमीन पवन पवार, विशाल पवार, विलासराज गायकवाड, रवी पगारे, विलास लोखंडे सह साथीदारांनी परस्पर बेकायदेशीररीत्या हस्तांतरीत केली. या जमिनीवर अवैधपणे कब्जा करून बनावट कागदपत्रे बनवून त्याआधारे नाशिकरोड ( Nashik Road ) व इतर परिसरातील नागरिकांना ही जमीन विक्री करून पैसे घेतले, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे तपास करत आहेत.
मे २०१८ मध्ये पवन पवार याने जागा खाली करून देण्याच्या मोबदल्यात एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. आम्ही नकार सकार दिला असता पवनचा भाऊ विशाल याने शिवीगाळ करून तुमचा व कुटुंबाचा मुडदा पाडून येथेच गाडून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच धक्काबुक्की केली. दहशतीपोटी व कुटुंबाच्या सुरक्षेपोटी पवन व विशाल पवारला पन्नास हजार रुपये दिले होते, असा दावा गांगुर्डे यांनी केला आहे.
काही महत्वाचे ठळक मुद्दे
मागील महिन्यापासून पवन पवार व इतर पसार
वरील सर्व संशयितांना नोटीस बजावणार
कायदेशीर कारवाईनंतर ताबा घेण्याची शक्यता
पतीवर गुन्हा दाखल झाल्याने माजी नगरसेविकेस धक्का
विलासराज गायकवाड सह इतर संशयितांचा शोध सुरू
गुन्हा नोंद झाल्याने जेलरोड, नाशिकरोड भागात खळबळ
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||

