नाशिक मध्ये वंचित, भिम आर्मी आजाद समाज पार्टी , संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नजरकैद करण्यात आले होते

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाने देशाची प्रतिमा मलिन होत आहे, देशात जातीय तेढ निर्माण होत आहे या संदर्भात त्यांच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारावी अशा आशयाचे नाशिक पोलीस यांना निवेदन देण्यात आले तसेच भिम आर्मी आजाद समाज पार्टी यांच्यावतीने ही निवेदन देऊन तसेच फेसबुक पोस्ट माध्यमातून देशाच्या विरोधात बोलणाऱ्या संभाजी भिडे वर सरकारने कारवाई करावी या भूमिका मांडण्यात आल्या परंतु हे सर्व असताना प्रशासनाने संभाजी भिडे यांस नाशिकमध्ये कार्यक्रमाची परवानगी दिली.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्या विरोधात निषेध आंदोलन करण्यासाठी जात असताना भिम आर्मी आजाद समाज पार्टी
युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे,उ.महाराष्ट्र महासचिव मुकेश गांगुर्डे,युवा उपाध्यक्ष बंटी थोरात
शहराध्यक्ष मनोज हिरे, जिल्हा उपाध्यक्ष विजू मोरे, नाशिक जिल्हा प्रभारी पंकज साळवे, यांना सायंकाळी 4 वाजता  सिबीएस येथिल कार्यालयातून अटक करून रात्री 10 वाजता सुटका करण्यात आली.

तसेच काही पदाधिकारी यांना म्हसरूळ पोलिस ठाणे,  या ठिकाणी भिम आर्मी आजाद समाज पार्टी च्या कार्यकर्त्यांना संदीप मोरे,मुकेश गांगुर्डे,मनोज हिरे,विजय मोरे, नजरकैद करण्यात आले होते. आणि काही पदाधिकारी यांना उपनगर पोलिस ठाणे, या ठिकाणी भिम आर्मी आजाद समाज पार्टी च्या कार्यकर्त्यांना बंटी थोरात,पंकज साळवे,साहिल सोनवने,गणेश निकम, नजरकैद करण्यात आले होते.

इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे सभेची परवानगी नाकारावी असे निवेदन दिलेले वंचित बहुजन आघाडीचे आयु. ताराचंद मोतवाल यांना दिवसभर नजर कैद करण्यात आहे होते. , पंचवटी पोलीस स्टेशन येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांना नजरकैद करण्यात आले होते अशी माहिती भिम आर्मी आजाद समाज पार्टी कडून देण्यात आली