
Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.
नाशिक ( २६/११/२०२५ ) संभाजी ब्रिगेडच्या वतीने तपोवन येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घातलेल्या घाटाच्या विरोधात म्हणजेच अठराशे पेक्षा जास्त झाडाच्या होणाऱ्या कत्तली विरोधात निषेध आंदोलन व आलिंगन आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर नाशिककर म्हणून नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आम्ही ही भूमिका घेऊन आमच्या नाशिकचा ऑक्सिजन असलेले तपोवनातील झाडे आम्ही तोडू देणार नाही वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत.
त्याचप्रमाणे ज्या श्रीरामांच्या नावाचा जोगवा मागून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला त्या रामांच्या विचारांना देखील तिलांजली देण्याचे काम मुख्यमंत्री किंबहुना कुंभमेळा मंत्र्यांनी केलेला आहे कुंभमेळा मंत्री म्हणजे मुह मे राम बगल मे कुलाडी अशीच अवस्था एकंदर या मंत्र्यांची झाली आहे. वृक्षप्रेमी पशुप्रेमी पक्षीप्रेमी किंबहुना सर्वच नासिककर कुंभमेळ्यात कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत पण कुंभमेळा मंत्री व नाशिक महानगरपालिका प्रशासन वेगळ्या भूमिकेत आहे याच्या निषेधार्थ आलिंगनांदोलन तपोवन येथे करण्यात आले या आलिंगन आंदोलनादरम्यान एक प्रार्थना देखील करण्यात आली कि गिरीश महाजन यांनाच पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर लावून फिरण्याची वेळ येऊ नये आणि अशा झाडांच्या कत्तली करू नये अशी श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. निषेध म्हणून आज जर वीरप्पन जिवंत असता तर भारतीय जनता पक्षाने त्याला राष्ट्रपती देखील केल असतं अशीच काहीशी भूमिका देखील नाशिक बाबतीत फडणवीस सरकारची आहे.हरित कुंभाच्या नावाखाली झाडांचीच कत्तल कुठला आदर्श नेमका यांच्या समोर आहे हाच नाशिककर म्हणून प्रश्न आहे
आंदोलनावेळी उपस्थित आमचे मार्गदर्शक हिरामण नाना वाघ, कॉम्रेड राजु देसले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ, महानगर प्रमुख विकी गायधनी, संविधान गायकवाड,निलेश गायकवाड,मंदार धिवरे, नितीन काळे,प्रेम भालेराव, सनी ठाकरे,गणेश सहाने,चेतन सोनवणे,संजय पांगारे,सचिन शिंदे,विक्रांत सूर्यवंशी, निलेश घोलप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


