Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नाशिक दोऱ्या निमित्त असताना नाशिक मधील विद्यमान ३ आमदार यांनी नाशिक शहरातील शांतता, कायदा, सुरक्षितता बद्दल निवेदन दिले तसेच खुनाची मालिका संपत नसल्याने नाशिक शहर आयुक्त साहेबांनी घेतला मोठा निर्णय शहर आयुक्तालयांतर्गत डझनभर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, ४० हून अधिक खून झाल्यानंतर, गेल्या सहा महिन्यांपासून शहरात खुनांची मालिका सुरू आहे. सर्व पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट दाखवले आहे आणि पोलिस विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
Nashik : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि एकूणच पोलिस विभागाविरुद्धचा सर्वसामान्यांचा रोष लक्षात घेता, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आणखी एक धाडसी निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहर आयुक्तालयांतर्गत डझनभर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुढील प्रमाणे बदल्या करण्यात आल्या अंबड पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक मधुकर कड यांची गंगापूर पोलिस ठाण्यात, गंगापूर पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत यांची अंबड पोलिस ठाण्यात, भद्रकाली पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक प्रकाश अहिरे यांची सातपूर येथे, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक संतोष नरोटे यांची एमआयडीसी चुंचाळे पोलिस ठाण्यात, आडगाव पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक संजय भिसे यांची सायबर विभागात, सातपूर पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक रणजित नलावडे यांची विशेष शाखेत आणि इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या उपअधीक्षक तृप्ती सोनावणे यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. नवनियुक्त अधिकाऱ्यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिककरांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न चालू : गेल्या सहा महिन्यांपासून शहरात खुनांची मालिका सुरू आहे. या काळात ४० हून अधिक खून झाल्यानंतर सर्वच पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट दाखवून पोलीस विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. नाशिक पोलिसांविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. यानंतर, नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहे की पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बदल्या लागू करून नाशिककरांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न चालू केला आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त आयु. संदीप कर्णिक साहेब यांच्या धाडशी कृती बद्दल नागरिकांत आशेचे किरण : बदल्या केल्यामुळे नागरिकांचे समाधान होतील परंतु खुनाचे सत्र थांबवणे मोठे आव्हान झाले आहे, त्यात पोलिसांचे राजकीय लोकांबद्दलचे छुपे संबध असल्याने काही राजकीय लोकांना त्याचा लाभ मिळतो असे लोकांचे बोलणे आहे. आता बदल्या झाल्यानंतर नाशिक शहरात शांतता प्रस्तापित होईन अशी आशा, नाशिक शहर पोलीस आयुक्त आयु. संदीप कर्णिक साहेब यांच्या निर्णयामुळे जनतेत विश्वासाची भावना निर्माण होत आहे त्यांच्या धाडशी कृती बद्दल नागरिकांत आशेचे किरण दिसत आहे.