
Nashik City Crime: शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या घरात बळी…, नाशिकमध्ये भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार करत तब्बल 50 लाखांना लुटलं
Nashik City Crime: जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेचे लैंगिक शोषण करून सुमारे पन्नास लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Nashik City News : पाथर्डी गावाजवळील तुळजाभवानी मंदिरानजीक असलेल्या भवानी माथा परिसरात एका मांत्रिकाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करून जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने ( Bhondu Baba) महिलेचे अनेक वर्षे लैंगिक शोषण करून सुमारे पन्नास लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी भोंदूगिरी करणारा गणेश जयराम जगताप ऊर्फ सम्राट मांत्रिक गणेश बाबा (47, रा. घारणगाव, कामाख्या मंदिर, निफाड) याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात ( Indiranagar Police Station, Nashik) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Nashik City Crime)
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचे दारूचे व्यसन घालवून देतो यानिमित्ताने संशयित भोंदूबाबा गणेश जगताप हा तिच्या संपर्कात आला. त्यानंतर गणेश हा पीडित महिलेला विविध तांत्रिक पूजाविधींसह वेगवेगळे दावे करत तसेच स्मशानभूमीत विधी करतो, अशा प्रकारच्या गोष्टी सांगून, तसेच तू मला आवडतेस, असे सांगत त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला.
Nashik City Crime: शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर… : यानंतर एक पुस्तक दाखवून त्यात फिर्यादी, तिचा पती व मुलांची नावे असल्याचे सांगत शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर यातील कोणाचाही बळी जाईल, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या धमकीच्या आधारे संशयिताने विविध ठिकाणी फिर्यादीवर अत्याचार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. याशिवाय बंगला घेऊन देतो, फ्लॅट मिळवून देतो, जमिनीतून सोने काढून देतो, पैशांचा पाऊस पाडून देतो, अशा एक ना अनेक खोट्या आश्वासनांनी फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांकडून सुमारे पन्नास लाख रुपये घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
Nashik City Crime: भोंदूबाबा फरार : या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयितावर बलात्कार, फसवणूक तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. इंदिरानगर पोलीस संशयीत भोंदूबाबा गणेश जगताप याचा शोध घेत आहेत. तो फरार झाल्याचे समजते. भोंदूबाबा जगताप पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक पीडित महिलांसह फसवणुकीच्या तक्रारी देण्यासाठी अनेक जण पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Nashik City Crime: भोंदूबाबाविरोधात याआधीही गुन्हे दाखल : भोंदुबाबा गणेश जगताप याने यापूर्वी पाथर्डी गावाजवळील भवानी माथा परिसरात बडेबाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट या नावाची संस्था सुरु केली होती. या ठिकाणी मंदीर देखील बांधले होते. याच मंदिरात येणाऱ्या भाविकांची फसवणूक केल्याच्या या पूर्वी देखील इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावेळी देखील त्याला अटक करण्यात आली होती.
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||

