
Nashik : आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंना अटक, भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल ; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली मोठी कारवाई
Nashik Crime News : शहरातील गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचे मिळणारे पाठबळ बघता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठी कारवाई केली आहे. भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंना अटक; नाशिक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला, शहरातील गुंडगिरी थोपवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
Nashik : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीनंतर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठी कारवाई केली आहे. गंगापूर (Gangapur) आणि सातपूर (Satpur) येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनेत भाजप नेते सुनील बागुल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागुलवर (Ajay Bagul) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) आणि लोंढे टोळीतील प्रमुख दीपक आणि भूषण प्रकाश लोंढे यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरातील गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचे मिळणारे पाठबळ बघता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे शहरातील गुंडगिरी थोपवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल रामवाडी आणि गंगापूररोड परिसरात काही दिवसांपूर्वी सचिन साळुंखे याच्यावर गोळीबार झाल्याप्रकरणी भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूलसह सात जणांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय बागूलसह अन्य तीन ते चार संशयित आरोपी फरार झाले असून, चार पोलिस पथके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला होता. या तपासात अजय बागूलसह बॉबी गोवर्धने, विकी ऊर्फ वैभव आणि इतर चार जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एक संशयित विकी ऊर्फ वैभव याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हा गुन्हा पूर्वनियोजित होता की नाही, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेनंतर शहर पोलिसांनी चौकशीस गती दिली असून, संशयितांच्या शोधासाठी चार वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपी लवकरच अटकेत येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
लोंढे पिता-पुत्र सहआरोपी सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक ऊर्फ नानाजी लोंढे यांना पोलिसांनी सहआरोपी केले असून, त्यांना काल ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणातील संशयितांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. शनिवारी ( दि. ६ ) रात्री सातपूर परिसरातील एका बिअर बारसमोर विजय तिवारी (20) या तरुणावर भूषण लोंढे यासह 10 ते 12 जणांनी पूर्वनियोजित कट रचून गोळीबार केला. या गोळीबारात विजय तिवारीच्या मांडीत गोळी लागली. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात याआधीच भूषण लोंढे याच्यासह 12 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, काही आरोपींना अटक झाली आहे. उर्वरित आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
तपासादरम्यान माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्याचा मुलगा दीपक लोंढे याच्यासह संतोष पवार आणि अमोल पगारे अशा चार जणांचा या प्रकरणात सहभाग आढळल्याने सातपूर पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेत सहआरोपी केले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली. या प्रकरणी भूषण लोंढे, शुभम पाटील उर्फ भुऱ्या, प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत डांगळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत चाळगे आणि चार अज्ञात अशा 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत भूषण पाटील, दुर्गेश वाघमारे व आकाश डांगळे यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. भूषण पाटील याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या फिर्यादीवरून खंडणीसाठी जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील गंभीरतेच्या पार्श्वभूमीवर आरोपींविरुद्ध ‘मोका’ अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातपूर परिसरात सुरू असलेल्या बार आणि अशा अड्ड्यांवर कोणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||

