
नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे असंघटित कामगारांच्या वतीने उप आयुक्तांना निवेदन
पंचवटी विभागात घाणीचे साम्राज्य वेळेवर घंटागाडी येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे असंघटित कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर नाना साबळे यांनी उप आयुक्तांना निवेदन दिले
नाशिक ( दि. 1/07/2025 ) : नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त अजय निकत साहेब (घनकचरा व्यवस्थापन विभाग) यांची राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर नाना साबळे यांनी भेट घेऊन पंचवटी विभागातील परिसर तपोवन, गणेशवाडी, नाग चौक,मोठा राजवाडा, निमाणी ,स्नेहनगर, ओंकारेश्वर महादेव मंदिर, म्हसरूळ, या ठिकाणी घंटागाडी वेळेवर येत नाही,अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झाले आहे, जागोजागी कचरा पडलेला आहे, दुर्गंधी पसरली आहे,
पंचवटी परिसरामध्ये घाणीचा साम्राज्य झाल्यामुळे रोगराई निर्माण होण्याची व पसरण्याची दाट शक्यता आहे डेंगू,मलेरिया असे आजार विविध उद्भवू शकतात,परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात येऊन अनेक तक्रारी दिले आहे, वरील सर्व विषय गंभीर आहे नागरिकांच्या आरोग्याच्या संबंधित आहे तरी आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंघटीत कामगार विभागाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले.
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||


