Nashik : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 15 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तसेच सभा अगर मिरवणुका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही कर्णिक यांनी आदेशात नमूद केले आहे.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 15 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. Post navigationनाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ७५ वर्षीय वृद्धाला अटक कुंभमेळ्यासाठी 4 मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीसाठी वृक्षतोड नाशिकमध्ये 1270 झाडांवर कुऱ्हाड चालणार!