नाशिक | प्रतिनिधी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक न घेतल्याचा आरोप होत असून, या घटनेच्या निषेधार्थ महिला वनरक्षक कर्मचारी माधवी जाधव व दर्शना सोपुरे यांनी ठामपणे आवाज उठवला. संविधानाच्या गौरवदिनीच संविधान निर्मात्यांचा उल्लेख टाळणे हे दुर्दैवी व निषेधार्ह असल्याचे मत महिला वनरक्षकांनी व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका आशाताई तळवी, नगरसेविका पूजा नवले व नगरसेविका ज्योती जोंधळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना नगरसेवक राहुल दिवे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नसून, ते संपूर्ण भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणे म्हणजे संविधानाच्या मूल्यांचा अवमान आहे.” महिला कर्मचाऱ्यांनी निर्भीडपणे मांडलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवम पाटील प्रवीण नवले अनिल जोंधळे दिलीप काका प्रधान बाबा पवार चंद्रकांत रकटे प्रवीण दारुणकर बळीराम शेळके अनिकेत गांगुर्डे गौरव केदारे तुषार सोनकांबळे अजय दिवे मयूर केदारे यांनीही महिला वनरक्षकांच्या भूमिकेचे समर्थन करत, सामाजिक न्याय, समता व बंधुतेच्या मूल्यांसाठी अशा आवाजाला नेहमीच पाठिंबा दिला जाईल, असे स्पष्ट केले. Post navigationनाव पांडवलेणी… पांडवांचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही.. एक अभ्यास नाशिक येथील त्रिरश्मी बौद्ध लेणीचा