नाशिक : पाथर्डी गावातील दोंदे मळ्यातील रस्ता पावसाळा सुरू होण्याचा अगोदरपासून खचलेल्या अवस्थेत असून शाळा , कॉलेजात , नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाचा प्रश्न बनलेला आहे, सदरील रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले असून नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होत आहे , पावसाचे पाणी खड्ड्यात साचून आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन साथीचे आजार बळावत आहे त्यात प्रामुख्याने महिला व लहान बालके बळी पडत आहे , ह्या संदर्भात महापालिकेने लवकरात लवकर नवीन रस्ता बनवून नागरिकांची समस्या सोडवावी, अन्यथा वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला, अशा आशयाचे निवेदन आज विभागीय आयुक्त अंबड येथे देण्यात आले ..सदर निवेदन देताना वंचित बहुजन युवक आघाडी नाशिक तालुका अध्यक्ष विकि वाकळे महासचिव संतोष वाघ, पाथर्डी शाखा प्रमुख आदित्य दोंदे ह्यांच्यासह परिसरातील नागरिक धमदीप कडू मोरे , बजरंग आसाराम भोले, सुनील रामजी गायकवाड, भारत अभिमान दवंडे, सुंदर खरात, विलास तायमन , चंदर उघडे,बबन कांबळे,रामेश्वर नामदेव सहार,अतुल काळे,साई ताकतोडे उपस्थित होते..! Post navigation🔹🔹नाशिक महानगरपालिका ,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूका ताकदीने लढवणार – अण्णासाहेब कटारे🔹🔹 Mumbai Bank: मुंबई बँक देणार लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने कर्ज देणार