Nashik Road : खुनाच्या आरोपींची नासिकरोड परिसरात धिंड

नाशिक रोड( प्रतिनिधी शशिकांत भालेराव) अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे हा नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात असतांना याची 29 सप्टेंबर 2025 रोजी रात्री ८ वाजता जेलमधून सुटल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ मोनू सोनवणे यश गीते श्रावण पगारे व नेपाळी व इतर असे एकूण 15 ते 20 जण त्यांचे साथीदार यांनी आरोपीला घ्यायला जात असताना.

नाशिक रोड परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण करून लोकांना मध्ये दहशतीचे वातावरण पसरवण्याचे काम करत असतांना यातील काही जण लोकांच्या अंगावर सुद्धा धावून त्यांना धाक व धमक्या देण्याचे काम आरोपीच्या साथीदारांनी केले असता अरुण गाडेकर यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यातयाआरोपीच्या साथीदारांबददलच्या कृत्याची दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करताच पोलीस डीसीपी काळे साहेब ए सी .पी डॉक्टर बारी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे साहेब व त्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन जेलमधील सुटलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या व त्याचे साथीदार यांना अटक करून यांची परिसरातून धिंड काढून लोकांमध्ये पोलिसांबद्दलचा मनात चुकीचा असलेला गैरसमज दुर करून पोलीस हे जनसामान्यांचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतात ते गैरकृत्य करणाऱ्या अशा कोणत्याही गुंडांना भीक घालणारे नाहीत अशी भावना निर्माण करून पोलिसांनी या गुंडांची नाशिक रोड बिटको परिसरातून खुलेआम पायी धिंड काढून सर्वसामान्य जनतेवर गुंडशाही करण्याचा प्रयत्न जर केला तर काय होईल गुंडशाहीचा बिमोड करण्यासाठी तसेच पोलिसांबद्दलचा सर्व सामान्य जनतेच्या मनातील गैरसमज दूर करून पोलीस हे सर्वसामान्यांचे संरक्षण करणारे आहेत हे दाखवून देण्याचे कार्य पोलीसांनी केले .तसेच आरोपीला नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या जेल मध्ये टाकून पुढील तपास नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो निरीक्षक करत आहे.
वृत्त संकलन नाशिक,  नाशिकरोड प्रतिनिधी : शशिकांत भालेराव.