पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा देत,मुस्लिम बांधवांसाठी अन्न व पाणी वाटप करण्यात आले

मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मोत्सव म्हणजेच ईद-ए-मिलाद-उन-नबी आज 5 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या आनंद उत्सवात नाशिक शहरात साजरा झाला.

नाशिकरोड/ जेलरोड या भागात मुस्लिम समाजाने एकत्र येत जुलूस रॅलीचे आयोजन करून पैगंबर मोहम्मद साहब यांचा जयजय केला. ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सर,कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शन आणि प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने नाशिकरोड जेलरोड व शहराच्या विविध भागात पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रिक्षा युनियन व होकर्स युनियन तसेच सर्व पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष ॲड.शशीभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शनात रॅलीमधील मुस्लिम बांधवांना खजूर,नानकटाई,पोहे,चिवडा असा अन्न व पाणी वाटप कार्यक्रम यावेळी संपन्न झाला.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर घोरपडे, होकर्सचे अध्यक्ष जावेद शेख,शकील शेख,इम्रान खान,राज निकाळे,रवी पगारे,रफीक टकारी,मुबिन खान, शोखत पिंजारी,जमील मणियार मोहम्मद तांबोळी,रशीद मणियार,रफीक मन्सुरी
संतोष भालेराव,हनिफ नूरा,अबिद शेख,शदाब शेख,अल्लादिन अन्सारी,मोसीन तांबोळी,रमजान तांबोळी,युनुस सय्यद,बिलाल शेख,हारुन टकारी अमजद शेख,सतीश आढाव,देविदास पवार,मुरली कोळे,शरद सोनवणे,नवनाथ माने,गणेश भालेराव,तुकाराम सायखेडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.