नवी दिल्ली: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशभरात सुरू असलेल्या विविध मुद्यांवरील आंदोलनांची माहिती एकत्र आणण्यासाठी ‘सत्याग्रह’ (Satyagraha) हे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. महात्मा गांधींच्या १५७ व्या जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी ‘सत्याग्रह’ – सत्यासाठी शांततापूर्ण लढा, या तत्त्वाचा पुनरुच्चार करत या वेबसाइटचे अनावरण केले आहे.वेबसाइटची मुख्य वैशिष्ट्ये: एक्स (X) वरील एका पोस्टद्वारे राहुल गांधींनी या उपक्रमाची माहिती दिली. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आंदोलक त्यांच्या आंदोलनाशी संबंधित सविस्तर माहिती सबमिट करू शकतात. तसेच, इंटरएक्टिव्ह नकाशाद्वारे (Interactive Map) देशभरात सुरू असलेल्या इतर समान चळवळी शोधून थेट पाठिंबा मिळवू शकतात.राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “देशभरातले लोक आपल्या हक्कासाठी लढत आहेत आणि बऱ्याचदा ते एकटेच लढतात. जन झी (Gen Z), विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी, दलित, महिला – प्रत्येक संघर्षाची स्वतःची एक कथा आहे. पण एकट्याने उठलेला आवाज बऱ्याचदा दाबला जातो. हा आवाज एका नकाशावर एकत्र आणण्याचा हा प्रयत्न म्हणजेच ‘सत्याग्रह’ आहे.”विरोधी पक्षनेते म्हणून माझी जबाबदारी: एका व्हिडिओ संदेशात राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षनेते म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या आंदोलनांची माहिती एकाच ठिकाणी गोळा करणे ही माझी जबाबदारी आहे. तुमचं आंदोलन लहान असो वा मोठे, तुमचं नाव, तुमच्या गटाचे नाव आणि आंदोलनाचे स्वरूप वेबसाइटवर नोंदवा. मी संसदेत असो, रस्त्यावर असो किंवा पत्र लिहून, जिथे गरज असेल तिथे तुमच्या पाठीशी उभा राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.शिक्षणाशी संबंधित आंदोलनांना सर्वाधिक प्रतिसाद: सध्या या ‘सत्याग्रह’ वेबसाइटवर १५० हून अधिक नोंदी (Submissions) प्राप्त झाल्या असून, यामध्ये सर्वाधिक ३६ नोंदी या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आंदोलनांच्या आहेत. विविध राज्यांमध्ये पेपर लीक आणि इतर मुद्यांवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनांचा यात समावेश आहे. Post navigationजंतर-मंतरवरील आंदोलन अधिकच आक्रमक; आतिशी, योगेंद्र यादव, नेहा बोरांसह ५०० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात निदर्शने; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला बजावली नोटीस