Skip to content

Menu

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress

नंबर १ मराठी न्यूज
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा
You are here :
  • Home
  • महाराष्ट्र
  • जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली ?
Written by November 20, 2025

जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली ?

महाराष्ट्र Article

मुंबई: राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून या निवडणुकीद्वारे एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदान होण्याआधीच काही जागांचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीच्या ज्योत्स्ना विसपुते यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या उमेदवार प्रतिभा झालटे आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ललवाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड – अमरावतीत भाजपने खाते उघडले

अमरावतीत भाजपने निकालापूर्वीच आपले खाते उघडले आहे. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. कलोती यांचा सामना काँग्रेससह 9 उमेदवाराशी होणार होता. या सगळ्यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कलोती यांची बिनविरोध निवड झाली आहे.  अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांना, प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यासह इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते.  कलोती यांच्या विजयानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे, देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याची टीका ठाकूर यांनी केली आहे.

हिंगोलीत अजब गजब प्रकार – भाजपचा उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेने फोडला, 

हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उभा असलेला भाजपचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपल्याकडे वळवला आहे. प्रभाग क्रमांक 16 ब मधून भाजपने भास्कर बांगर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भास्कर बांगर यांनी ऐनवेळी माघार घेत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.  भास्कर बांगर यांनी उमेदवारी मागे घेत शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे मानले जात आहे.

You may also like

Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला

November 26, 2025

Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.

November 26, 2025

Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, 50 लाखांची आर्थिक फसवणूक भोंदू बाबा अद्यापही फरार

November 23, 2025

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress