नाशिक: नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. शहरातील अंबड औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरातील दत्त नगर आणि आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये बोअरवेलचे पाणी अचानक पिवळ्या रंगाचे आणि दुर्गंधीयुक्त झाल्याचे समोर आले होते. या पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीत त्यामध्ये अत्यंत विषारी आणि कर्करोगजन्य मानले गेलेले हेक्साव्हॅलेंट क्रोमियम (Chromium-VI) हे रसायन प्रमाणपेक्षा तब्बल १ हजार पट जास्त आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.पाण्यात आढळले ५०.३ मिलीग्राम क्रोमियम:पिण्याच्या पाण्यात क्रोमियमचे प्रमाण कमाल मर्यादा ०.०५ मिलीग्राम प्रति लिटर (mg/L) असावी लागते. मात्र, येथील भूगर्भातील नमुन्यांमध्ये याचे प्रमाण तब्बल ५०.३ मिलीग्राम प्रति लिटर इतके धोकादायक স্তरावर पोहोचल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे.स्थानिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न:या विषारी पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक नागरिकांना त्वचेचे आजार, अंगावर फोड येणे, रॅशेस आणि क्रोमियम अल्सरसारख्या गंभीर त्रासाचा सामना करावा लागला आहे. पाणी उकळून किंवा साध्या गाळणीने शुद्ध करूनही हे विषारी रसायन कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई:स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत परिसरातील अनधिकृत आणि निकष पाळत नणाऱ्या इलेक्ट्रोप्लेटिंग व रासायनिक कारखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. अनेक कारखान्यांचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आले असून दोषींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.आरोग्यासाठी मोठा धोका:हेक्साव्हॅलेंट क्रोमियम हे अत्यंत घातक मानले जाते, ज्यामुळे त्वचेचे आजार, कर्करोग (Cancer) आणि शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांचे गंभीर नुकसान होऊ शकते. प्रशासनाकडून प्रभावित भागात टँकरद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आणि भूगर्भ जलशुद्धीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Post navigationनाशिकच्या चोरट्यांचा मुंबईत प्रताप! घाऊक खरेदीदार बनून लुटले लाखांचे कपडे; खखार पोलिसांनी आवळल्या मुसक्या