राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जुलै १९०२ मधील ऐतिहासिक आरक्षण निर्णयाची प्रेरणा…आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी, २ जुलै २०२६ रोजी मुंबईत भव्य राज्यव्यापी जनआंदोलनउपवर्गीकरण विरोधी राज्यव्यापी विराट जनआक्रोश मोर्चादिनांक ०२ जुलै २०२६ – दुपारी १२:०० वाजता, आझाद मैदान-मुंबई, महाराष्ट्र राज्यनाशिकच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत झालेल्या महाराष्ट राज्यव्यापी निर्णायक बैठकीत जनआंदोलनाचा निर्धारनाशिक : आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकर नगर, नाशिक येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सामाजिक, राजकीय, संविधानवादी, कर्मचारी, युवक, विद्यार्थी, महिला आणि आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींची राज्यव्यापी निर्णायक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात आणि व्यापक सहभागातून संपन्न झाली.आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात संविधानिक चौकटीत, लोकशाही मार्गाने आणि सामूहिक नेतृत्वाच्या बळावर राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. अनुसूचित जातींच्या संविधानिक अधिकारांचे संरक्षण, सामाजिक न्यायाची हमी आणि आरक्षण व्यवस्थेची एकात्मता अबाधित राखण्यासाठी व्यापक जनजागृती व संघटनात्मक संघर्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.आढावा बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी एकमताने पुढील कृती आराखड्यास मान्यता दिली: १) मुख्यमंत्री व राज्यपालांची भेटमहाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री आणि मा. राज्यपाल यांची समस्त अनुसूचित जाती समाजातील ५९ प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भेट घेणार असून, आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील अंसवैधानिक कायदा रद्द करण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे.२) ०२ जुलै २०२६ रोजी मुंबईत भव्य राज्यव्यापी जनआंदोलनराजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जुलै १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानात सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण लागू करून सामाजिक न्यायाच्या इतिहासात क्रांतिकारी पर्वाची सुरुवात केली. त्या ऐतिहासिक निर्णयाला अभिवादन करण्यासाठी आणि आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील जनभावना लोकशाही पद्धतीने व्यक्त करण्यासाठी दिनांक २ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता आझाद मैदान, मुंबई येथे भव्य राज्यव्यापी जनआंदोलन आयोजित करण्यात येणार आहे.३) महाराष्ट्र कोअर कमिटीची स्थापनाराज्यभर समन्वय, जनजागृती, संघटनात्मक बांधणी आणि आंदोलनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रस्तरीय कोअर कमिटीची स्थापना करण्यात येणार आहे.४) सर्व घटकांचा व्यापक सहभागसमस्त अनुसूचित जाती समाजातील सामाजिक, शैक्षणिक, कर्मचारी, युवक, विद्यार्थी, महिला, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय संघटनांना या आंदोलनात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.सामूहिक नेतृत्वाचा निर्धारबैठकीत स्पष्ट करण्यात आले की, हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीचे, संघटनेचे किंवा पक्षाचे नसून सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येक घटकाचे आंदोलन आहे.या बैठकीस सभानायक कृष्णा शिंदे, कॅप्टन कुणाल गायकवाड, ॲड. प्रवीण साळवे,ॲड. सुरेश माने, माजी आमदार बाबुराव माने, प्रबुद्ध साठे , डी. टी. गोतीसे,करुणासागर पगारे, प्रा. गंगाधर अहिरे, अरुण भालेराव, ॲड. विजय निर्भवने,डॉ. डी एल कराड , सागर संसारे,राजू देसले,काळुराम चौधरी,अशोक कांबळे,बाळासाहेब शिंदे,अतुल डोळस, ॲड. चंद्रकांत निकम, डॉ. विशाल जाधव, ॲड. कृष्णा शिलावत, प्रशांत वंजारे .भाऊ भोजणे ,ॲड ज्योती दूधसाखरे , शरद गोरे, ॲड कैलास जैस्वार ,निलेश गांगुर्डे, लालचंद शिरसाठ, सुनील कदम,ॲड विजय वानखेडे, प्रशांत खरात ,सत्यजित साळवे, तुषार पगारे, विजय बागुल, डॉ आशिष तांबे , संतोष शिंदे,गणेश खंदारे ,ॲड.राजेंद्र रणशुर ,शरद शेजवल.प्रवीण कर्डक.राज खेळकर.कैलास गायकवाड ,यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.– समस्त अनुसूचित जाती सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य Post navigationNashik : भद्रकाली येथील प्रसिद्ध साक्षी गणेश मंदिरातून भरदिवसा दोन किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरीला गेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन