नाशिक : जेल रोड परिसरात स्वतःला ‘अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी’ असल्याचे भासवून एका पान टपरी चालकाकडे तब्बल १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 नेमके प्रकरण काय ? 
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगून शरद रामचंद्र गायकर , सरला शरद गायकर, सुनील गजानन मालुसरे, शरद भगवान पाटील, गौरी महेश बर्डे, सरिता संजय मोरे जेल रोड येथील दीपक पोपटराव बोराडे शिवनेरी पानटपरी चालकावर कारवाईची भीती दाखवली. टपरीवरील सामानामध्ये भेसळ असल्याचे सांगत, ही बाब दाबण्यासाठी त्यांनी टपरी चालकाकडे १० लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली. टपरी चालक यास संशय आल्याने त्यांनी त्यांचे मित्र पत्रकार संदीप नवसे यांस सदर प्रकरणाची माहिती दिली त्यावरून संदीप नवसे आणि टपरी बालक यांनी सदर अधिकाऱ्यांचे ओळखपत्र तपासणी करता असतात महिला गोंधळून गेल्या आणि अधिकाऱ्यांचे ओळखपत्र खोटे आढळून आल्याने त्यांनी उपनगर पोलीस स्टेशन यांना कळवले त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अटक केली
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ही मागणी अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याने टपरी चालकाने या प्रकाराला विरोध केला. त्यानंतर या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना देण्यात आली. तक्रारीची दखल घेत उपनगर पोलीस ठाण्यात या बनावट अधिकाऱ्यांच्या टोळीतील शरद रामचंद्र गायकर , सरला शरद गायकर, सुनील गजानन मालुसरे ,
शरद भगवान पाटील , गौरी महेश बर्डे , सरिता संजय मोरे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, बनावट अधिकारी बनून फिरणाऱ्या या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि अशा प्रकारे त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
नागरिकांना अशा प्रकारच्या संशयास्पद व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने कारवाईसाठी आल्यास त्यांचे अधिकृत ओळखपत्र तपासणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.