लखनऊ/ दि. 15 – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे जागतिक श्रध्दास्थान आहे. महाबोधी महाविहार हा आमच्या धम्माचा हक्क आहे. महाबोधी महाविहारचे सर्व ट्रस्टी हे बौध्दच असले पाहिजे, महाबोधी महाविहारचे चेअरमन ही बौध्दच असले पाहिजे. जोपर्यंत महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा आमचा सुरुच राहील असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज व्यक्त केला. लखनौ येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आयोजित धम्म महोत्सव मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते.यावेळी पूज्य भंते विनाचार्य; भंते अर्यवंश; भंते अनुकृती;भंते अनिरूद्ध; रिपब्लिकन पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.लखनऊ येथे महाबोधी महाविहार आंदोलनातील सर्व भिख्खु संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. महाबोधी महाविहार मुख्य आंदोलनाचे प्रमुख पुज्य भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात यावेळी भिख्खु संघाची बैठक घेण्यात आली होती. त्यात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे, यासाठी सुरु झालेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मोठी भुमिका बजावलेली आहे. बुध्दगया, पटणा, महाराष्ट्र, दिल्ली आदि अनेक ठिकाणी ना. रामदास आठवले यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेवुन आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे यासाठी बुध्दगया येथे भेट देवुन त्यांनी पटना येथे बिहारचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान आणि बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला सक्रिय सहभाग घेवुन पाठिंबा दिल्यामुळेच केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना आज लखनऊ येथे महाबोधी महाविहार आंदोलनाच्या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन निमंत्रित केल्याची माहिती यावेळी भंते विनाचार्य यांनी दिली. यावेळी संपूर्ण उत्तरप्रदेशमधील 300 बौध्द भिख्खु उपस्थित होते. उत्तरप्रदेशात सर्व जिल्हयांमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा तिव्र करण्याच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुज्य भंते विनाचार्य यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन उत्तरप्रदेशात तीव्र करण्याची घोषणा केली.येत्या 26 ऑगस्टपासुन पुज्यभंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात भिख्खु संघ संपूर्ण उत्तरप्रदेशात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी भव्य यात्रा सुरु करणार आहे. या यात्रेला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे ना. रामदास आठवले यांनी जाहीर केले. उत्तरप्रदेशात सर्व जिल्हयात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पुजनीय भिख्खु संघाला रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते पूर्ण पाठिंबा देतील अशी ग्वाही ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिली.हेमंत रणपिसे, प्रसिध्दीप्रमुख यांच्यावतीने प्रेस नोट द्वारे कळवण्यात आले Post navigationउपवर्गीकरण विरोधात बसपा ने धरणे आंदोलन केले २००५ पूर्वीच्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील नोटांबाबत मोठा बदल; १ जुलैपासून फक्त RBIच्या १९ शाखांमध्येच बदलता येणार