नवी दिल्ली: मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेले आंदोलन प्रचंड तापले आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत आम आदमी पक्षाच्या नेत्या तथा माजी मुख्यमंत्री आतिशी, स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव, AISA च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांच्यासह तब्बल ५०० हून अधिक आंदोलक आणि विद्यार्थी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.जंतर-मंतरवर पोलिसांची मोठी कारवाईमुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने विद्यार्थी, कार्यकर्ते आणि विरोधक जमा होण्यास सुरुवात झाली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देत पोलिसांनी परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त लावला होता. १० किंवा त्याहून अधिक लोकांच्या समूहाला एकत्र जमण्यास मज्जाव करत पोलिसांनी धडक कारवाई केली. यादरम्यान आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरा, योगेंद्र यादव आणि आतिशी यांच्यासह ५०० हून अधिक जणांना बळाचा वापर करून ताब्यात घेत विविध पोलीस ठाण्यात हलवण्यात आले.“मत चोरीविरोधात आवाज उठवणे गुन्हा नाही”पोलिसांच्या या दडपशाहीवर तीव्र संताप व्यक्त करत नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. योगेंद्र यादव यांनी, “मतदानात छेडछाड करणाऱ्यांना प्रश्न विचारणे जर गुन्हेगारी ठरत असेल, तर आम्ही हा गुन्हा पुन्हा-पुन्हा करू,” असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे, आंदोलक नेत्यांनी लोकशाही मार्गाने निदर्शने करण्याचा अधिकार नाकारला जात असल्याचा आरोप करत सरकारविरोधी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून, निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Post navigationआशियाई खेळ २०२६: भारतासाठी ‘सुवर्ण दिन’! तिरंदाजीत तिन्ही सुवर्णपदकांवर कब्जा, तर नीरू धांडा आणि क्यान चेनचीनेट्रॅप प्रकारात पटकावले सुवर्ण राहुल गांधींनी लाँच केले ‘सत्याग्रह’ डिजिटल प्लॅटफॉर्म; देशभरातील आंदोलनांची माहिती एकाच नकाशावर उपलब्ध