अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातीमध्ये अ ब क ड असे उपवर्गीकरण करण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या असंवैधानिक निर्णयाच्या विरोधात तसेच खुल्या प्रवर्गात ओबीसी, एसटी व एससी समाजातील गुणवंत (मेरिट) प्रतिनिधींना नाकारणाऱ्या 14 मे रोजी च्या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाचा निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी आज संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश बसपा चे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, माजी नगरसेवक संजय जैस्वाल यांच्या नेतृत्वात बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करून बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र धरणे व निदर्शने करण्यात आली.नागपूर चे निवासी जिल्हाधिकारी अनुप खंडे यांची भेट घेऊन बसपाच्या शिष्टमंडळाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले. शिष्टमंडळात प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, शहर महासचिव मंगेश नागदेवे, शहर लोकसभा प्रभारी शितल नाईक, ग्रामीण लोकसभा प्रभारी राजकुमार बोरकर, विद्यार्थी नेते सौरभ जामगडे यांचा समावेश होता. यापूर्वी बसपाने 13 एप्रिल व 21 मे रोजी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिली आहेत.अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करू पाहणारे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, अनुसूचित जातीत भांडणे लावून इच्छिणारे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, आरक्षणाचा बॅकलाग न भरणारे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, आरक्षण विरोधी-संविधान विरोधी महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मागास वर्गीयातील गुणवंतांना खुल्या प्रवर्गात प्रवेश नाकारणारे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, sc का उपवर्गीकरण रद्द करो, मनूवादी सरकार मुर्दाबाद, फुले शाहू आंबेडकरवाद जिंदाबाद आदि घोषणा देऊन नारे निदर्शने करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने विद्यार्थी नेते आशिष फुलझेले, जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, शहर सचिव अमित बनसोड, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, उत्तर नागपूरचे अध्यक्ष धीरज डोंगरे, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष सहदेव पिल्लेवान, पश्चिम नागपूरचे अध्यक्ष मनोज निकाळजे, मध्य नागपूरचे प्रवीण पाटील, पूर्व नागपूरचे प्रभारी सत्यवान मेश्राम, हिंगणा विधानसभेचे प्रभारी सुधाकर सोनपिपळे, अनिल मेश्राम, युवा नेते अंकित थुल, स्वप्निल ढवळे, ओमप्रकाश शेवाळे, आदेश रामटेके, प्रेम पाटील, जनार्दन मेंढे, दिलीप रामटेके आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.उत्तम शेवडे (9373102942) मीडिया प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश बस Post navigationभारतातील 10 महान महिला नेते : ज्यांनी देशाच्या इतिहासाला दिली नवी दिशा