नाशिक : अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यातही दूध पनीर चीज आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीवर कारवाई करण्यावर तुकाराम मुंढे यांचा भर आहे. त्यांच्या या कारवाईचे कौतुक करणारे व्यंगचित्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील किरण मोरे यांनी रेखाटले आहे, हे व्यंगचित्र सध्या समाज माध्यमावर वेगाने वाढल होत आहे.भेसळखोरांवर केल्या जात असलेल्या कारवाईमुळे ग्राहकांना शुद्ध, आरोग्यदायी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळतीलच. पण शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल, अशी अशा ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या विविध शेतकरी संघटना आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी तुकाराम मुंडे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. याचीच दखल घेऊन नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे दखल घेणारे व्यंगचित्र रेखाटले आहे. सध्या समाज माध्यमावर हे व्यंगचित्र वेगाने व्हायरल होत आहे.किरण मोरे हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील शेतकरी, कांदा उत्पादक आणि कांदा दरासाठी व्यंगचित्र व व्यंगचित्राच्या माध्यमातून लढा देणारे सक्रिय आंदोलकी आहे. कांदा प्रश्न बाबत ते सातत्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून आवाज उठवतात. मात्र तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांनी मुंडे यांच्या कामाचे कौतुक करणारे व्यंगचित्र रेखाटल्यामुळे किरण मोरे यांचे कौतुक केले जात आहे.त्यांच्या कार्याला सलाम असेच व्यंगचित्र रेखाटून जनतेस समाजातील प्रश्न, आशा लोकांपर्यंत पोहोचत राहो हीच आशा आम्ही बाळगतो. Post navigationअनुसूचित जातीची लिस्ट ही ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे: सिद्धार्थ शिनगारे अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी चळवळ आणि ५९ जातींचा राज्य सरकारविरोधात एल्गार