वैजापुर शहरातील, जिल्हा संभाजीनगर येथील दिवंगत रोहित अनिल पठारे, वय-२५ वर्षे या एका आंबेडकरी तरूण भीमसैनिकाची वैजापुरातील परदेशी नावाच्या कुख्यात गुन्हेगार टोळीने पठारेच्या घरात घुसून त्याला लाकडी दांडक्याने, फावड्याचे दांड्याने, लोखंडी सळई – राॅड, दगडाने ठेचून, त्याच्या तोंडात बोळा कोंबून, त्याच्या दोन्ही पायावर बर्फ तोडण्याच्या टोच्याने खोलवर जखमा करून , त्याला मोटरसायकलला बांधून रस्त्याने फरफटत नेऊन क्रुरपणे खुन केल्याची घटना घडली आहे. या क्रुर खुनाच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ ऊडाली आहे. आरोपी हे वैजापुर येथील कुख्यात परदेशी नावाचे गुन्हेगार टोळीतील असून या गुन्हेगारांनी नियोजितपणे कट- कारस्थान रचून, जीवघेणे हत्यारे व गुन्हेगार साथीदारांना गोळा करून,केवळ जातीयव्देषातून रोहितचा अमानुषपणे खून केलेला आहे. यातील सर्वच आरोपी हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे व नगराध्यक्षाचे कार्यकर्ते असून त्यांनी सदरच्या हत्याकांडातील मास्टर माईंडच्या सांगण्यावरून, पडद्यामागील राजकिय ताकदीच्या जोरावर सदरचे क्रुर हत्याकांड घडविल्याची चर्चा परिसरात आहे. हत्याकांडातील हल्लेखोरांनी मयत रोहितला जातीयवाचक शिवीगाळ करत, त्याला मोटरसायकला मागे फरफटत, मारत-मारत, रस्त्याने धिंड काढून हत्या केलेली आहे.सदर हत्याकांडाचा निषेध करून, अत्याचार विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने वैजापुरचे डीवाय एसपी फुंदे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाव्दारे या हत्याकांडातील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. सदर हत्याकांडातील आरोपी विरूध्द बी एन एस चे कलम १०३ (२) म्हणजेच “माॅब लिंचिंग ” चे गु्न्हेगारी कलमान्वये गुन्हयाची नोंद करावी तसेच या हत्याकांडातील मास्टर माईंडचा शोध घेऊन त्याला अटक करून कठोर शिक्षा व्हावी , यासारख्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. सदर हत्याकांडाचा तपास राज्य गुप्तचर यंत्रणा म्हणजेच सी आय डी मार्फत करावा ही देखील मागणी केली आहे, सदरच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास समितीच्या वतीने राज्यभर आंदोलनाचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल तुपलोंढे, संविधान सन्मान वकील समिती नाशिक जिल्ह्याचे ॲडव्होकेट निलेश सोनवणे, रिपब्लिकन नेते शिवाजी गायकवाड, कामगारनेते महादेव खूडे, युवानेते राहुल जाधव, वंचीत बहूजन आघाडी वैजापुर तालुका ऊपाध्यक्ष बरूडे, रिपब्लीकन नेते अशोक बागुल , सिनिअर वकील राजेंद्र बागुल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. Post navigationबाह्यस्रोत पदभरती बंद करा.- मुख्यमंत्री याना काष्ट्राईब महासंघाची मागणी. रायगडावरून निघणार शिंदेसेनेची ‘संविधान वाचन यात्रा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित