महाराष्ट्रात मोठया प्रमाणात आउटसोर्सिंग द्वारा विविध विभागा अंतर्गत विविध पदासाठी खासगी कंपनी द्वारा कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. या भरती मध्ये सामाजिक आरक्षण लागू होतं नसल्याने मागासवर्गीय उमेदवारावर अन्याय होतं आहे.तसेच सेवा पुरविणाऱ्या संस्था कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण करतात. कर्मचाऱ्यांना वेठबिगारी प्रमाणेवागणूक देतात म्हणून बाह्यस्रोत द्वारा कंत्राटी भरती बंद करावी अशी मागणी काष्ट्राईब महासंघा तर्फे अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांनी काष्ट्राइब महासंघा तर्फे रामगिरी नागपूर येथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांची भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन देऊन चर्चा केली.
. मागण्या
अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण जाती जातीत भेदभाव करणारे असल्याने रद्द करावे,
7 मे 2021चा शासन निर्णय रद्द करून मा उच्च न्यायालयाचे एप्रिल 2026च्या निर्णयानुसार मा सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेशास अधीन राहून मागासवर्गीयांना पदोन्नती देण्यात यावी,
समाज कल्याण विभागाचा निधी लाडकी बहीण योजना किंवा इतरत्र वळविण्यात येऊ नये.
परदेशीं शिष्यवृत्ती ची संख्या 300करण्यात यावी व क्रिमी लेअर ची अट रद्द करावी,

30/10/2023चा समानता आणणारा शासन निर्णय असंविधानिक असल्याने रद्द करणे ,
कंत्राटी भरती रद्द करणे. पवनी हे ऐतिहासिक दृष्ट्या बौद्ध संस्कृतीचे प्राचीन शहर असल्याने येथे 200एकर जमीन अधिग्रहित करून आंतर राष्ट्रीय दर्जाचे पाली -बौद्ध विद्यापीठ स्थापन करावे. मागासवर्गी्यांची सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी या व इतर मागण्याचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी, महासंघाचे श्यामराव हाडके, रवि पोथारे, राजेश ढेंगरे, मुकुंद मेंढे, अनिल गायकवाड उपस्थित होते. मा मुख्यमंत्री यांनी संबंधित विषयावर लवकरच बैठक आयोजित करून प्रश्न निकाली काढण्याबाबत आश्वासित केले.