रिपब्लिकन पक्षाच्या सर्व जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडी व विविध आघाड्यांच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना कळविण्यात येते कि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार राज्य सरकारने उपवर्गीकरणा संदर्भात घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत..
नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय उपवर्गिकरण करू नये तसेच बदर समितीचा अहवाल रद्द करावा आणि बदर समितीचा अहवाल सार्वजनिक प्रकाशित करावा या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक २७ जुलै रोजी दुपारी ठिक १२:३० वाजता महसूल आयुक्त कार्यालय नाशिकरोड या ठिकाणी रिपाईचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मा.नगरसेवक संजयजी (नाना )भालेराव यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करून महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी सदर निदर्शन कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मा. नगरसेवक प्रभारी जिल्हाध्यक्ष संजयजी (नाना) भालेराव यांनी केले आहे.

रिपाई – आठवले सोशल मिडिया आयटी सेल, नाशिक जिल्हा..

कळावे आपलेचं..
महेंद्र सोनवणे, आकाश घुसळे.
सोशल मिडिया आयटी सेल नाशिक जिल्हा.