नाशिक : नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरक्षा संहितेच्या कलम 163 (1) व (3) अंतर्गत महत्त्वाचा मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश 6 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीपासून 4 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, धर्मशाळा, हॉटेल, लॉज तसेच घरमालकांनी आपल्या येथे राहणाऱ्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये ओळखपत्र, मूळ पत्त्याचा पुरावा, अलीकडील छायाचित्र आणि भाडेकराराची प्रत सादर करावी लागणार आहे. ही माहिती https://nashikcitypolice.gov.in/ या संकेतस्थळावरही ऑनलाइन देता येणार आहे. तसेच परदेशी नागरिकांची माहिती, वाहन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, भंगार विक्रेते, सिमकार्ड विक्रेते, सायबर कॅफे चालक तसेच औद्योगिक मनुष्यबळ व सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सींनाही संबंधित व्यक्तींची संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवून पोलीस प्रशासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 223 तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिक, घरमालक, व्यावसायिक आणि संबंधित संस्थांनी या आदेशाचे काटेकोर पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. Post navigationमहाराष्ट्रात धर्मांतराविरोधात कडक कायदा लागू राष्ट्रपतींची मंजुरी; बेकायदेशीर धर्मांतराविरोधात ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद महाराष्ट्र मध्ये अन्न व औषध प्रशासन चा नागरिकांना मोठा सल्ला